नवी दिल्ली,28 फेब्रुवारी: संपूर्ण देशाला हादरावून सोडणाऱ्या दिल्लीतील निर्भया गँगरेप प्रकरणीतील (Nirbhaya Gang Rape)नराधमांच्या फाशीची तारीख जवळ आली आहे. चारही नराधमांना येत्या 3 मार्चला सकाळी 6 वाजता फासावर चढवण्यात येणार आहे. फाशीच्या शिक्षेला चार दिवस बाकी असताना स्वत:ला वाचवण्यासाठी नराधम अजूनही प्रयत्न करत आहेत. दोषी पवन कुमार गुप्ता याने शुक्रवारी सुप्रीम कोर्टात चूकभूल सुधार याचिका (curative petition) दाखल केली आहे. फाशीची शिक्षा आजीवन कारवासात बदलण्यात येण्याची मागणी पवन कुमार याने या याचिकेद्वारे केली आहे.
दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टाने (Patiala House Court)तिसऱ्यांदा डेथ वारंट (Death Warrant)जारी केला आहे. त्यानुसार चारही दोषींना 3 मार्चला सकाळी 6 वाजता तिहार जेलमध्ये फासावर लटकावण्या येणार आहे. या पार्श्वभूमीवर तिहार जेल प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
26/11च्या हल्ल्यात केली होती महत्त्वाची कामगिरी, आता लैंगिक शोषणप्रकरणी..
पवन कुमार गुप्ताचे वकील ए पी सिंह यांनी सांगितले की, पवनने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या चूकभूल सुधार याचिका दाखल केली आहे. फाशीची शिक्षा आजीवन कारवासात बदलण्यात येण्याची मागणी पवन कुमार याने केली आहे. चारही दोषीपैकी चूकभूल सुधार याचिका दाखल करणारा पवन एकमेव आहे. याआधी पवन याने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करण्याचा पर्याय निवडला नाही.
2012 Delhi gang-rape case: Fourth death row convict in the case, Pawan Kumar Gupta, files a curative petition before the Supreme Court seeking direction to commute his death sentence to life imprisonment. pic.twitter.com/RZ2kALcuyk
— ANI (@ANI) February 28, 2020
चारही नराधमांना 3 मार्च रोजी सकाळी 6 वाजता फासावर लटकावणार
संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या दिल्लीतील निर्भया गँगरेप प्रकणातील चारही नराधमांना 3 मार्च रोजी सकाळी 6 वाजता फासावर लटकवण्यात येणार आहे. पटियाला हाऊस कोर्टाने (Patiala House Court) चारही नराधमांच्या फाशीच्या मुहुर्तावर शिक्का मोर्तब केला आहे. कोर्टात आरोपींविरोधात नवं डेथ वॉरंट जारी करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. दोषी पवनला कोर्टाने दिलेल्या नव्या वकीलांकडून पहिल्यांदा पवनची बाजू मांडली. मात्र, कोर्टाने ती फेटाळून लावत नवं डेथ वॉरंट जारी केले आहे. कोर्टाने आतापर्यंत जारी केलेले हे तिसरे डेथ वॉरंट आहे.
मुंबईत सुसाट गाडी चालवणार असाल तर सावधान, आपोआप घरी येईल पावती!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.