मुंबई,2 फेब्रुवारी: मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या अग्निशमन दलाच्या एका जवानाला लैंगिक शोषणप्रकरणी 5 वर्षांचा कारवास आणि 10 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आला आहे. दयानंद कांबळे असे शिक्षा झालेल्या दोषीचे नाव आहे. 26/11 च्या हल्ल्यावेळी कांबळे याने आग विझविण्याची महत्त्वाची कामगिरी बजावली होती.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दोषी दयानंद कांबळे याने 2018 मध्ये एका अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केले होते. या प्रकरणी कोर्टाने बाललैंगिक शोषण आणि संरक्षण कायद्यांतर्गत आणि पोक्सो अॅक्टच्या कलम 8 आणि 12 अंतर्गत दयानंद कांबळेला दोषी ठरवत त्याला 5 वर्षांचा कारवास आणि 10 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
1 मेपासून पूर्णपणे प्लास्टिक बंदी, आदित्य ठाकरेंचा महत्त्वपूर्ण निर्णय
काय आहे प्रकरण?
पीडित मुलगा त्याच्या मित्राला शोधत कांबळेंच्या घरी पोहोचला होता. त्यावेळी कांबळे याने त्याला घरात घेत त्याचे लैंगिक शोषण केले होते. पीडित मुलगा तेव्हा आठ वर्षांचा होता. घरी गेल्यावर या पीडित मुलाने आईला आपबिती दिली. त्यानंतर या मुलाचे आई-वडील कांबळेच्या घरी गेले तेव्हा त्याच्या घराला कुलूप लावलेले होते. त्यानंतर त्यांनी त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी कांबळे याला अटक केली होती.
दयानंद कांबळे याचा अशा गुन्ह्यांचा पूर्व इतिहास नाही, असे सांगत कांबळेने 26/11 च्या हल्ल्यावेळी आग विझविण्याचे महत्त्वपूर्ण काम केल्याचे वकिलाने कोर्टात सांगितले. कांबळे या मुलाला क्रिकेट खेळण्यास मज्जाव करायचा. त्यामुळे त्याला या प्रकरणात विनाकारण गोवण्यात आल्याचे कोर्टात सांगितले. दरम्यान, दयानंद कांबळेच्या घराच्या खिडकीला चेंडू लागला होता मात्र त्यांनी कधीही रागावले नसल्याचे पीडित मुलाला कोर्टात सांगितले. याप्रकरणात कांबळेला नाहक गोवण्यात आल्याचे कोर्टाने मान्य केले नाही.
मॉलमध्ये दोन वर्षाच्या चिमुरड्याची किंचाळी ऐकून धावले आई-बाबा, तोपर्यंत..
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: 26 11 mumbai terror attack, 26/11.26 11 mumbai terror attack, Breaking news, Mumbai attacks, Mumbai terror attack