Paytm वापरताय? या क्रमांकांपासून सावध रहा अन्यथा खातं होईल रिकामी

Paytm वापरताय? या क्रमांकांपासून सावध रहा अन्यथा खातं होईल रिकामी

पेटीएम वापरकर्त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी संशयित क्रमांकाची यादी जाहीर करण्यात आली आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 26 जानेवारी : आपण डिजिटल युगात पदार्पण करीत आहोत. अगदी छोट्या छोट्या दुकानांमध्येही पेटीएम, गुगल-पेचा पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. मात्र हा वापर अधिक सजग राहून करावयास हवा. अनोखळी फोनला स्वत:ची वैयक्तिक माहिती देणे टाळावे. त्यांनी कोणताही अॅप डाऊनलोड करावयास सांगितल्यास आधी खातरजमा करून घ्य़ावी. अन्यथा ग्राहकांना मोठं नुकसान सहन करावं लागेल. जर तुम्ही Paytm बॅंकेचा (Paytm Payments Bank) चा वापर करीत असाल तर सावधान. तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे. पेटीएम वापरकर्त्यांची  फसवणूक होऊ नये यासाठी संशयित क्रमांकाची यादी जाहीर करण्यात आली आहे. PPB ने 3500 फोन नंबरची यादी गृह मंत्रालय, ट्राय (Trai) आणि सीईआरटी-इन (CERT-In)  कडे दिली आहे. या नंबरच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. भविष्यात ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी पीपीबीने या मोबाइल क्रमांकाविरोधात सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे.

मोबाइल फोन, एमएमएस आणि कॉलच्य़ा माध्यमातून फसवणूक

ट्राई, गृह मंत्रालय आणि सीईआरटी-इन यांच्या अधिकाऱ्यांसोबतच्या अनेक बैठकांमध्ये संवेदनशील सूचना आणि फसवणूक करणारे मोबाइल क्रमांक, एसएमएस आणि कॉलद्वारे सुरू असलेल्या घोटाळ्यांची माहिती देण्यात आली आहे. या फसवणुकीमुळे डिजिटल व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. सीआईरटी-इन कम्पुटर सुरक्षासंबंधातील प्रकरणात कारवाई करणारी एजंसी आहे. पीपीबीने सांगितल्यानुसार अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत कंपनीने स्पष्ट केले आहे की याप्रकारे फसवणुकीच्या प्रकरणांमुळे ग्राहकांचा विश्वास कमी होतो. मात्र ही प्रकरणे विविध संस्थांच्या मदतीने रोखण्यात येऊ शकतात.

पेटीएमवर केवायईसीच्या मुद्द्यावरुन फसवणूक

Paytm मधील केवायसी (KYC) च्या नावावर फसवणूक केली जात असल्याची सर्वात जास्त प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये फसवणूक करणारे पेटीएम कस्टमर केअर टीमचे सांगून ग्राहकांना कॉल करतात. ते ग्राहकांना पेटीएम सर्विस सुरू ठेवण्यासाठी केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करतात. यासाठी ते ग्राहकांना अॅप डाऊनलोड करण्यास सांगतात. या अॅप च्या साहाय्याने हॅकर ग्राहकांची माहिती चोरी करतात आणि त्यांच्या पेटीएम अकाऊंटमधील पैसे चोरतात.

First published: January 26, 2020, 12:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading