नागरिकांनो सजग रहा, प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्याला अतिदक्षतेचा इशारा

नागरिकांनो सजग रहा, प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्याला अतिदक्षतेचा इशारा

दहशतवादी संघटना, समाजकंटकांकडून घातपात घडविले जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनाही सजग राहण्याचे आवाहन पोलीस महासंचालक सुबोध जैयस्वाल यांनी केले आहे

  • Share this:

मुंबई, 26 जानेवारी : आज 71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही हिंसक घटना घडू नये यासाठी राज्याला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यभरात गर्दीच्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. आज मुंबईतील शिवाजी पार्क येथे संचलन होणार असल्याने दादर भागात मोठी गर्दी होण्य़ाची शक्यता आहे. सुरक्षिततेच्यादृष्टीने सर्व खबरदारी घेण्यात आली असून नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून  देशभरात CAA, NRC, NRP वरुन विरोध होत असल्याने अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या आहेत. दहशतवादी संघटना, समाजकंटकांकडून घातपात घडविले जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनाही सजग राहण्याचे आवाहन पोलीस महासंचालक सुबोध जैयस्वाल यांनी केले आहे. शनिवारी रात्रीपासून महत्त्वाच्या रस्ते मार्गांवर नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली जात आहे. आज प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. देशभरात आयोजित केलेले सर्व कार्यक्रम सुरक्षितपणे पार पडावे, यासाठी पोलिसांकडून विशेष काळजी घेण्यात आली आहे.

मुंबईची सुरक्षा वाढवली

मुंबईतील २०० हून अधिक संवेदनशील ठिकाणी पोलिसांनी कडोकोट बंदोबस्त केला आहे. मुंबई ही कायम दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याने मुंबईत अधिक काळजी घेण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी नागरिकांना अलर्ट राहण्यास सांगितले असून काही अनियमित घटना दिसल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अन्य बातम्या

कोरोना व्हायरसचा भारतात धोका वाढला, संशयितांची संख्या 100वर; PMO कडून अलर्ट

प्रजासत्ताक दिनाबद्दल या गोष्टी माहिती आहेत का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 26, 2020 08:32 AM IST

ताज्या बातम्या