मराठी बातम्या /बातम्या /देश /

भारीचं आहे! वयाच्या 16 व्या वर्षी CEO; कंपनीची उलाढाल पाहून धक्काच बसेल!

भारीचं आहे! वयाच्या 16 व्या वर्षी CEO; कंपनीची उलाढाल पाहून धक्काच बसेल!

वयाच्या एकविसाव्या वर्षी आपल्यापैकी अनेकांना आयुष्यात नक्की काय करायचं आहे याची कल्पना आलेली नसते. निखिल जाधवची गोष्ट मात्र वेगळी आहे.

वयाच्या एकविसाव्या वर्षी आपल्यापैकी अनेकांना आयुष्यात नक्की काय करायचं आहे याची कल्पना आलेली नसते. निखिल जाधवची गोष्ट मात्र वेगळी आहे.

वयाच्या एकविसाव्या वर्षी आपल्यापैकी अनेकांना आयुष्यात नक्की काय करायचं आहे याची कल्पना आलेली नसते. निखिल जाधवची गोष्ट मात्र वेगळी आहे.

    भोपाळ, 18 फेब्रुवारी : भोपाळचा (Bhopal) निखिल जाधव (Nikhil Jadhav). हा वयाच्या सोळाव्या वर्षी 'बायकर्स प्राईड (Bikers Pride) नावाच्या कंपनीचा फाउंडर आणि सीईओ (CEO) झाला आहे. त्याची कंपनी इलेक्ट्रिक कस्टमाईज्ड सायकल्स (electric customized cycles) तयार करते. 2018 साली सुरू झालेल्या त्याच्या कंपनीची नेटवर्थ आज 1 कोटी 10 लाख रुपये आहे. मागच्या आर्थिक वर्षात (economical year) त्याच्या कंपनीची उलाढाल 40 लाख रुपये होती. निखिल स्वतः क्रॉस कंट्री सायकलिस्ट (cross country cyclist) आहे. वयाच्या सतराव्या वर्षी त्यानं एकट्यानं मुंबई-पुणे-गोवा अशी 1000 किलोमीटरची सायकलसफर केली होती. केवळ पाच दिवसात हे अंतर त्यानं कापलं होतं. मागच्या तीन वर्षात त्यानं तीनशेहून अधिक इलेक्ट्रिक बायसिकल तयार केल्या आहेत. याव्यतिरिक्त देशभरात त्याच्या 150 डिलरशिप (dealership) आहेत. इथं त्याच्या सायकल्स विकल्या जातात. आपल्या सायकलच्या पॅशनबाबत निखिल सांगतो, 'मला लहानपणी घरच्यांनी सायकल घेऊन दिली होती. मी एमपीच्या एका प्रोफेशनल सायकलिंग ग्रुपसोबत जोडला गेलो. गुपचे फाउंडर माजी आयएएस अधिकारी सत्य प्रकाश (Ex IAS Satya Prakash) यांनी खूप काही शिकवलं. त्यांच्याकडे त्यांनी स्वतः कस्टमाईज केलेल्या 100 सायकल्सचं कलेक्शन होतं. त्याच्याकडूनच मी प्रेरणा घेतली. आधी मी माझ्या स्वतःसाठी एक सायकल तयार केली. ती माझ्यासह अनेकांना खूप आवडली. मग मी इतर सायकलिस्टसाठीही काही सायकल्स बनवल्या. माझा छंद व्यवसाय कसा बनला मलाही कळालं नाही. हेही वाचा10 हजाराचं बिल आणि लाखोंची टीप; कपलनं वेटरला का बनवलं लखपती? निखिल बीबीए सेकंड इयरपर्यंत शिकला. मात्र बिझनेस इतका वाढला की सेकंड इयरनंतर त्याला व्यवसायात पूर्णपणे लक्ष देण्यासाठी शिक्षण सोडावं लागलं. आज निखिलचं सुपर प्रीमियम सायकल मॉडेल 80 हजारांच्या घरात आहे. निखिलच्या स्टार्ट-अप मध्ये आज 9 लोक काम करतात. मध्य प्रदेश सरकारनं 2018 साली आयोजित केलेल्या 'स्टार्ट अप एमपी' या (Start up MP) स्पर्धेत 1200 स्पर्धकांमधून निखिल पहिला आला होता. तिथूनच त्याच्या व्यवसायानं मोठी उडी घेतली. भोपाळमध्ये त्याच्या घरीच त्यानं बायसिकल कस्टमायजेशन स्टुडिओ बनवलेला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bhopal News, Bikers pride, Business News, CEO, Inspiring story, Nikhil jadhav, Startup

    पुढील बातम्या