मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

10 हजाराचं बिल आणि लाखोंची टीप; कपलनं वेटरला का बनवलं लखपती?

10 हजाराचं बिल आणि लाखोंची टीप; कपलनं वेटरला का बनवलं लखपती?

हे कपल या वेटरवर इतकं खूश का झालं, हे जाणून घ्यायची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल.

हे कपल या वेटरवर इतकं खूश का झालं, हे जाणून घ्यायची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल.

हे कपल या वेटरवर इतकं खूश का झालं, हे जाणून घ्यायची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल.

  • Published by:  Priya Lad
वॉशिंग्टन, 17 फेब्रुवारी : हॉटेल (Hotel) किंवा रेस्टॉरंटमध्ये (restaurant) खाण्यासाठी गेल्यानंतर वेटरला टिप देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा काही जण तर नाक मुरडतात. काही जण आपली द्यायची म्हणून टिप देतात. पण तसं टिप म्हटलं की ती सामान्यपणे बिलाच्या रकमेपेक्षा कमीच असते. पण एका कपलनं बिलाच्या रकमेपेक्षा कित्येक तरी पटीनं जास्त टिप वेटरला दिली आहे. तुम्हाला वाचून धक्का बसेल पण 10 हजार रुपयांचं बिल असलेल्या या कपलनं वेटरला जवळपास दीड लाख रुपयांची टिप दिली आहे. यूएसमधील शिकागोतील (Chicago) क्लब लकी (Club Lucky)  रेस्टॉरंटमध्ये एक कपल 12 फेब्रुवारी, 2021 रोजी गेलं. तिथल्या पदार्थांचा आस्वाद त्यांनी घेतला. त्यांचं बिल झालं, 137 डॉलर्स म्हणजे 9,976 हजार रुपये. पण या कपलनं वेटरला जी टिप दिली ती तब्बल 2 हजार डॉलर्सची म्हणजे तब्बल 1,45,605 रुपयांची.
WOW! WOW! WOW! WOW!🎉💖😳 This guest had his first date with his now wife 20 years ago at Club Lucky on February 12. He... Posted by Club Lucky on Sunday, 14 February 2021
कपलनं काही क्षणातच वेटरला लखपती बनवलं आहे. बरं हे कपल या वेटरवर इतकं खूश का झालं, हे जाणून घ्यायची उत्सुकता आता तुम्हाला नक्कीच असेल. या रेस्टॉरंटनं आपल्या फेसबुक पेजवर या बिलाचा फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये या बिलाची, टिपची रक्कम आणि त्यावर कपलनं लिहिलेला मेसेजही आहे. या कपलनं नेमकं असं का केलं याचं कारणही रेस्टॉरंटनं पोस्टमध्ये सांगितलं आहे. हे वाचा - अरे देवा! कर्ज फेडलं नाही म्हणून Underwear सुद्धा सोडली नाही; चक्क लिलावात काढली रेस्टॉरंटनं दिलेल्या माहितीनुसार हे कपल 20 वर्षांपूर्वी याच रेस्टॉरंटमध्ये पहिल्यांदा भेटलं होतं आणि ज्या दिवशी हे कपल भेटलं त्याच दिवशी, त्याच वेळेला, त्याच टेबलवर दरवर्षी ते दोघं एकत्र येतात. रेस्टॉरंटने पोस्टमध्ये सांगितलं, "गेस्टनं आपली पहिली डेट आमच्या रेस्टॉरंटमध्ये केली होती. गेली 20 वर्षे 12 फेब्रुवारीला ते क्लब लकीमध्ये येतात. दरवर्षी संध्याकाळी  7:30 वाजता 46 क्रमांकाच्या टेबलवर ते भेटतात. आम्हीदेखील दरवर्षी यादिवशी हे टेबल राखून ठेवतो. त्यांच्या आयुष्यातील ही तारीख खूप स्पेशल आहे आणि आम्ही सर्वजण सेलिब्रेट करतो" हे वाचा - प्रेमासाठी वाट्टेल ते! 3 महिन्यांसाठी कपलनं स्वतःला अडकवलं एकाच बेडीत त्यांच्या या भेटीला 12 फेब्रुवारी, 2021 रोजी  20 वर्षे पूर्ण झाली आणि हा आनंद शिवाय रेस्टॉरंटनं दिलेली उत्तम सेवा यासाठी या कपलनं वेटरला इतकं मोठं गिफ्ट दिलं आहे.
First published:

Tags: Restaurant, Tips

पुढील बातम्या