• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • काय सांगता! घरी असलेल्या गाडीचा 300 किमी दूर कापला जातो टोल; Fast Tag मध्ये गोंधळच गोंधळ

काय सांगता! घरी असलेल्या गाडीचा 300 किमी दूर कापला जातो टोल; Fast Tag मध्ये गोंधळच गोंधळ

प्रवास न करताच टोल कापला गेल्याच्या अनेक तक्रारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एनएचएआयकडे (NHAI) तक्रारी दाखल झाल्या आहेत.

 • Share this:
  छिंदवाडा, 02 सप्टेंबर: देशभरात महामार्गावर (National Highway) लागू करण्यात आलेल्या फास्टॅग यंत्रणेमुळे (Fast tag System) टोल नाक्यावर (Toll Plaza) टोल भरण्यासाठी लागणारा वेळ अतिशय कमी झाला असला तरी फास्टॅगमधील गोंधळाचा अनेक वाहनचालकांना विनाकारण भुर्दंड बसत असल्याच्या घटनाही उघडकीस येत आहेत. प्रवास न करताच टोल कापला गेल्याच्या अनेक तक्रारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एनएचएआयकडे (NHAI) तक्रारी दाखल झाल्या आहेत. भास्कर डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार, प्रवास न करताच दूरवरच्या भलत्याच कुठल्यातरी टोल नाक्यावर आपल्या गाडीचा टोल कापला गेल्याचे मेसेज वाहन चालकांना येत असून, त्यांच्या खात्यातील पैसे टोलसाठी वजा झाल्याचे आढळत आहे. यामुळे वाहन चालक चक्रावून गेले असून, गुन्हेगारांनी आपल्या गाडीच्या नंबरचा वापर करून फास्टॅग खात्यात परस्पर व्यवहार घडवून आणल्याची शक्यता असल्यानं त्यांना भीती वाटत आहे. नुकत्याच मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) अशा दोन घटना उघडकीस आल्या आहेत. अंबेश बलवापुरी (Ambesh Balavapuri) नावाचे एक उद्योजक आपली कार (MP48C8777) घेऊन 3 जुलैपासून छिंदवाडा (Chhindwada) इथे गेले. या दरम्यान त्यांनी मिलनपूर आणि चिखली टोलनाके ओलांडले. या दोन्ही टोल नाक्यावर त्यांच्या फास्टॅग खात्यातून कर कापण्याचा संदेश आला होता. त्यानंतर 3 तारखेनंतर ते छिंदवाडा इथून कुठेही बाहेर गेले नाहीत तरीही 4 जुलै रोजी रात्री 8.32 वाजता त्यांना महाराष्ट्रातील (Maharashtra) यवतमाळ जिल्ह्यातील (Yavatmal District) केळापूर टोल नाक्यावर (kelapurToll plaza) त्यांची गाडी गेल्याने 90 रुपये टोल कापला गेल्याचा मेसेज आला. हा टोल नाका नागपूर-हैदराबाद-बेंगळुरू-कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर असून तो छिंदवाडापासून तब्बल 295 किमी अंतरावर आहे. हा मेसेज बघून अंबेश यांना धक्का बसला. आपल्या कारचा क्रमांक आणि फास्टॅगशी जोडलेल्या खात्याचा वापर करून ही फसवणूक केल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी ताबडतोब भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (एनएचएआय) तक्रार दाखल केली. हे वाचा - मेव्हणीला करीत होता ब्लॅकमेल, जुमानत नसल्याने अपहरण करून मित्रांसह केला बलात्कार दरम्यान, असाच प्रकार बैतूलचे (Baitul) सराफ व्यावसायिक उषभ गोठी यांच्याबाबत घडला. त्यांची कार (MP 48 BC 9911) घराच्या बाहेरच उभी होती, मात्र गुरुवारी, दुपारी 4 वाजता 175 किमी महाराष्ट्रातील पाटण सावंगी (Patan Savangi) इथं त्यांच्या गाडीचा टोल कापला गेल्याचा संदेश मिळाला. त्यांच्या खात्यातून 90 रुपये कापले गेले होते. त्यांनीही एनएचएआयकडे तक्रार दाखल केली आहे. एकाच नंबरवर दोन फास्टॅग जारी केले गेले असतील किंवा टोलवर स्थापित केलेले स्कॅनर फास्टॅग स्कॅन करू शकले नाहीत, तर मॅन्युअली एंट्री केली जाते तेव्हा गाडीच्या क्रमांकाच्या अंकांमध्ये फेरफार होऊ शकतो, अशा दोन स्थितीमध्ये अशाप्रकारे टोलची रक्कम कापली जाऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे एखाद्या गुन्ह्यात वापरल्या गेलेल्या गाडीसाठी खोटी नंबर प्लेट वापरून फास्टॅग खात्याशी जोडली असेल. त्या गाडीसाठी टोल कापला गेला तर तो नंबर ज्या व्यक्तीच्या गाडीचा आहे त्याला टोल कापल्याचा मेसेज मिळेल. अशा परिस्थितीत फास्टॅगद्वारे झालेले पेमेंट हा एक सबळ पुरावा बनू शकतो. असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे अंबेश आणि उषभ यांना चिंता वाटत असून, या प्रकरणी लवकर कारवाई करण्याची आणि आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. वाहन मालक एनएचएआयकडे 1033 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून तक्रार करू शकतो. यानंतर टोल व्यवस्थापन कॅमेरा फुटेज तपासून वाहन प्रत्यक्षात तिथून गेले नसल्याची खात्री करेल आणि रक्कम परत करेल.
  First published: