नागपूर, 2 सप्टेंबर : नागपूरमधील गुन्हेगारीचं सत्र सुरूच असल्याचं दिसून येत आहे. नागपुरात घडलेल्या या घटनेनंतर पुन्हा एकदा शहर हादरलं आहे. येथील एका व्यक्तीने आपल्या मेव्हणीला दारू पाजून तिच्यावर मित्रांसह सामूहिक बलात्कार केला. इतकच नाही तर तिचं अपहरण करून 3 लाखांची रक्कम मागितली. जेव्हा मेव्हणीने पैसे देण्यास नकार दिला, तर तिला सिगारेटचे चटके दिले. ही घटना नागपूर शहरातील मानकपूर पोलीस ठाणे हद्दीत घडली. महाराष्ट्राची क्राईम कॅपिटल नागपूरमध्ये स्वत:च्याच मेव्हणीसोबत दुष्कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शहरातील मानकपूर पोलीस ठाणे हद्दीत घडला. पीडिता गोधनी भागात राहते. ती ट्यूशन संपवून स्वत:च्या घरी जात होती. यावेळी तिच्या मेव्हण्याने पाहिलं व तो तिच्या जवळ गेला. तिला घाणेरडे व्हिडीओ दाखवू लागला आणि सार्वजनिक ठिकाणी घाणेरडे चाळे करू लागला. त्यावेळी मेव्हणा मंगेश याचे मित्र निलेश आणि त्याच्या मित्रांनी पीडितेचं अपहरण केलं. यावेळी त्यांनी पीडितेचे डोळे बांधले होते. अपहरणानंतर तिला अज्ञात स्थळी नेण्यात आलं. येथे आधीच एक मुलगी असल्याचं तिच्या लक्षात आलं. या तरुणीलाही मारहाण केली जात होती. यानंतर पीडितेलाही तिच्या मेव्हण्याने मारहाण केली. तिला जबरदस्तीने दारू पाजण्यात आली आणि त्यानंतर तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. हे ही वाचा- बडा घर पोकळ वासा; पुण्यात 1 किलो सोन्यासाठी उच्च शिक्षित विवाहितेचा अमानुष छळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला तब्बल 2 दिवस तेथेच बांधून ठेवण्यात आलं होतं. तिच्याकडून 3 लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती. मात्र पीडितेने पैसे देण्यास नकार दिला तर तिला सिगारेटचे चटके देण्यात आले. पीडितेचे अश्लील व्हिडीओ आरोपीजवळ होते, आणि त्याच्या आधारावर तो तिला ब्लॅकमेल करीत होता. पैसे दिले नाही तर तिचे व्हिडीओ व्हायरल करेल अशी धमकी तिला दिली होती. पोलिसांनी पुढे सांगितलं की, सुरुवातील आरोपींनी पीडितेकडून 25 हजार रुपये वसूल केले होते. दुसऱ्यांना 24 हजार रुपये घेतले होते. आता तर त्यांनी 3 लाखांची मागणी केली होती. पैसे देण्यास पीडितेने नकार दिला असल्याने तिचं अपहरण करण्यात आलं होतं. यानंतर तिला दारू पाजण्यात आली आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. कसंबशी पीडिता येथून पळून जाण्यात यशस्वी ठरली. यानंतर तिने पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी तातडीने कारवाई करीत आरोपींना ताब्यात घेतलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.