मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोरोनाला रोखण्यासाठी भारताकडे आहेत फक्त 30 दिवस, तज्ज्ञांनी दिला इशारा

कोरोनाला रोखण्यासाठी भारताकडे आहेत फक्त 30 दिवस, तज्ज्ञांनी दिला इशारा

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

30 दिवसात कोरोनाला न रोखल्यास भारताच्या अडचणी वाढणार, तज्ञांनी दिले कारण

  • Published by:  Priyanka Gawde

नवी दिल्ली, 14 मार्च : कोरोनाव्हायरस (Coronavirus) भारतात वेगाने पसरत आहे. या धोकादायक विषाणूला रोखण्यासाठी सरकार वेगवान पावलेही उचलत आहे. कित्येक राज्यांमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, तर देशाच्या राजधानीसह काही राज्यात हा साथीचा रोग म्हणून जाहीर करण्यात आला आहे. मात्र पुढचे 30 दिवस देशासाठी खूप महत्वाचे ठरणार आहेत.

भारतातील कोरोना विषाणू सध्या दुसऱ्या टप्प्यात आहे. त्यामुळे कोरोनाला तिसऱ्या टप्प्यात येण्यापासून रोखण्यासाठी भारताच्या हातात फक्त 30 दिवस आहेत. तज्ज्ञांच्या मते, कोरोना विषाणू आवश्यक ती पावले उचलण्यास आणि अंमलबजावणी करण्यात अयशस्वी ठरल्यास भारतात हा विषाणू आणखी तीव्रतेने पसरण्याची शक्यता आहे.

वाचा-...तर कोरोनाग्रस्त रुग्णांना भोगावा लागणार 21 वर्ष तुरुंगवास, सरकारचा अजब फतवा

भारतात कोरोनाचा दुसरा टप्पा

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक बलराम भार्गव यांनी, "भारत Covid-19 सध्या दुसऱ्या टप्प्यात आहे. त्यामुळे सध्या पदेशातून प्रवास केलेल्या लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. व्हायरस थांबविणे सध्या सरकारसाठी महत्त्वाचे आहे”, असे सांगत कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी भारताकडे 30 दिवस आहेत, असेही ते म्हणाला. 30 दिवस कोरोनाला रोखल्यास तो तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करणार नाही.

वाचा-कोरोनापासून बचावासाठी 'मास्क'चा जुगाड! पाहा ‘हा’ व्हिडीओ

चीन-इटलीमध्ये सहाव्या टप्प्यात आहे कोरोना

चीनच्या वुहान शहरात सुरू झालेला कोरोना विषाणूची दहशत जगभरात पसरली आहे. भारतासह जगातील अन्य देशांमध्ये सतत नवीन प्रकरणे नोंदवली जात आहेत. चीनमध्ये या विषाणूमुळे हजारो लोकांचा बळी गेला आहे. त्याचबरोबर इटली आणि इराणमध्येही दिवसेंदिवस परिस्थिती वाईट होत आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूमुळे चीन आणि इटलीमधील परिस्थिती सहाव्या टप्प्यात पोहोचली आहे. तर भारतात कोरोना सध्या दुसऱ्या टप्प्यात आहे.

वाचा-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांची मोठी घोषणा, अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी

कोरोनाचा भारतात दुसरा बळी

कोरोना व्हायरसमुळे याआधी कर्नाटकातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर शुक्रवारी (13 मार्च) रोजी दिल्लीत आणखी एक घटना समोर आली आहे. त्यामुळे कोरोनोमुळे भारतात झालेल्या बळींची संख्या आता 2 झाली आहे. कर्नाटकातल्या (Karnataka) कलबुर्गीमध्ये 76 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. ही व्यक्ती कोरोनाव्हायरसची संशयित रुग्ण होती, अशी माहिती सरकारने दिली होती.

First published:

Tags: Corona