जाहिरात
मराठी बातम्या / Viral / कोरोनापासून बचावासाठी 'मास्क'चा जुगाड! पाहा ‘हा’ व्हिडीओ

कोरोनापासून बचावासाठी 'मास्क'चा जुगाड! पाहा ‘हा’ व्हिडीओ

कोरोनापासून बचावासाठी 'मास्क'चा जुगाड! पाहा ‘हा’ व्हिडीओ

मास्कच्या वाढत्या मागणीमुळे त्याच्या तुटवडा जाणवत आहे. मास्कऐवजी स्वच्छ धुतलेला रुमाल वापरणं हा खरं तर सोपा आणि सोयीचा पर्याय. पण प्रत्यक्षात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे हा पेपर नॅपकिनचा मास्क.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई , 14 मार्च - तुम्ही ही कोरोना व्हायरसपासून (coronavirus) बचावासाठी मास्क घालत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कोरोना व्हायरसने coronavirus सध्या जगभरात थैमान घातलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जण काळजी घेताना दिसत आहे. काळजीसाठी प्रत्येक जण मास्कचा वापर करत आहे. पण मास्कच्या अती मागणीमुळे मास्क मिळणंच अवघड झालं आहे. मास्कऐवजी स्वच्छ धुतलेला रुमाल वापरणं हा खरं तर सोपा आणि सोयीचा पर्याय. पण प्रत्यक्षात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे हा पेपर नॅपकिनचा मास्क. आरोग्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे मास्क ऐवजी रुमाल वापरला तरीही ते चालणार आहे. पण तरीही जनसामान्यांमधील याबाबतची भीती ही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे आता मास्कवरही उपाय निघत आहेत. अशाच्या एका जुगाडू उपायाचा व्हिडीओ सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विट केला आहे. 5 मिनिट्स क्राफ्ट नावाने लोकप्रिय असेलेले VIDEO तुम्हा पाहात असाल तर हा पेपर नॅपकिन किंवा टिश्यू पेपरचा मास्क कसा 5 मिनिटात करायचा याचा व्हिडीओ नक्कीच तुम्ही पाहिला असेल. आता या मास्कचा कोरोना व्हायरसला अटकाव करण्यासाठी किती उपयोग होईल माहीत नाही. पण फटाफट मास्क तयार करण्याची युक्ती अनेकांना आवडली आहे असं दिसतंय. **वाचा -** कोरोना : MPSCची परीक्षा पुढे ढकला, 96 हजार विद्यार्थी चिंतेत या व्हिडिओला लाखो हिट्स मिळाले आहेत. सोबतच या प्रकारचे मास्कही मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आले आहेत. एका प्रकारे use and throw मास्क म्हणून हे मास्क आपल्याला वापरण्यात येणार आहेत. आनंद महिंद्रा यांनी ट्विट केला हा व्हिडिओ -

जाहिरात

दरम्यान राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. पुण्यातही रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील इतर चारही जिल्ह्यांमध्ये कोरोनासंबंधीच्या उपाययोजना सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. शक्य असले गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे.

पुण्यात शाळा बंद पुणे, मुंबई, नवी मुंबई, नागपूर इथल्या जीम, थिएटर्स, स्वीमिंग पूल बंद ठेवण्यात येणार आहेत. मॉल, हॉटेल्स रेस्टॉरंट्स बंद नाहीत. पण तिथे जाणं टाळा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. सार्वजनिक जत्रा, धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमांना सरकार परवानगी देणार नाही. पूर्वी दिलेली परवानगी रद्द करण्यात येईल. जिथे शक्य आहे, त्या सर्व खासगी संस्थांना वर्क फ्रॉम होम करण्यासंदर्भातली मुभा द्यावी, असं सांगण्यात आलं आहे. ही अधिसूचना मध्यरात्रीपासून लागू होत आहे. अन्य बातम्या - धक्कादायक! 38 वर्षीय अभिनेत्रीचा Heart Attack ने मृत्यू ‘…तर कंगना अभिनय करणं सोडून देईल’ रंगोली चंडेलचं बॉलिवूडकरांना ओपन चॅलेंज

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात