मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

...तर कोरोनाग्रस्त रुग्णांना भोगावा लागणार 21 वर्ष तुरुंगवास, सरकारचा अजब फतवा

...तर कोरोनाग्रस्त रुग्णांना भोगावा लागणार 21 वर्ष तुरुंगवास, सरकारचा अजब फतवा

इटलीमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्याने अवघ्या 24 तासांत 1266 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसंच 24 तासांत कोरोनाने बाधित होणाऱ्यांची संख्या 2116वर गेली आहे.

इटलीमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्याने अवघ्या 24 तासांत 1266 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसंच 24 तासांत कोरोनाने बाधित होणाऱ्यांची संख्या 2116वर गेली आहे.

इटलीमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्याने अवघ्या 24 तासांत 1266 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसंच 24 तासांत कोरोनाने बाधित होणाऱ्यांची संख्या 2116वर गेली आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
रोम, 14 मार्च : जगभरात कोरोना व्हायरसची (Coronavirus) दहशत पसरत आहे. एकीकडे भारतातही कोरोनाची शिरकाव झाल्यानंतर इटलीमध्ये तर हाहाकार उडाला आहे. इटलीमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्याने अवघ्या 24 तासांत 1266 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसंच 24 तासांत कोरोनाने बाधित होणाऱ्यांची संख्या 2116वर गेली आहे. दरम्यान, कोरोनाचा सामना करण्यासाठी इटलीने एक अजब फतवा काढला आहे. कोरोनाव्हायरसची लक्षणे दिसल्यास, त्या व्यक्तिला 14 दिवस वेगळे राहावे लागते. दरम्यान संशयित रुग्णाने असे करण्यास नकार दिल्यास त्याला 21 वर्ष तुरूंगवासाची शिक्षा भोगावी लागू शकते. इटलीमधील सरकारी अधिकाऱ्यांनी असा इशारा दिला आहे. वाचा-कोरोनापासून बचावासाठी 'मास्क'चा जुगाड! पाहा ‘हा’ व्हिडीओ कोरोना व्हायरसची लक्षणे जसे की, खोकला, ताप किंवा त्वचेचा आजार असल्यास त्यांनी इतरांशी संपर्क टाळावा, अथवा त्यांना खुनाचा प्रयत्न केल्याची शिक्षा होऊ शकते. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी या सरकारने अजब फतवा काढला आहे. वाचा-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांची मोठी घोषणा, अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी ..तर भोगावा लागणार तुरुंगवास चीनपासून सुरू झालेला कोरोना व्हायरस आता युरोपमध्ये पोहोचला आहे. युरोपमधील अनेक देशांमध्ये या व्हायरसने धुमाकूळ घातला असून इटलीतील स्थिती तर दिवसेंदिवस खराबच होत चालली आहे. या रोगामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही इटली मोठ्या प्रमाणात आहे. सध्या इटलीमध्ये मेडिकल आणि रुग्णालय वगळता इतर सर्व देश लॉकडाउन करण्यात आला आहे. नागरिकांना आरोग्य किंवा कामाच्या कारणास्तव प्रवास करण्यास परवानगी नाही आहे. त्यामुळं या आजाराला आळा घालण्यासाठी आणि संसर्ग थांबवण्यासाठी रुग्णांवरच गुन्हा दाखल करण्यास इटली सरकारने सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णामुळे इतर कोणाला लागण होण्याचा धोका असल्यास त्याला सहा महिने ते तीन वर्षे तुरुंगवास भोगावा लागू शकतो. वाचा-कोरोनामुळे इटलीत मृत्यूचं थैमान, अवघ्या 24 तासांत 1266 लोकांनी गमावला जीव 'हेतुपूर्वक हत्येचा' गुन्हा होणा दाखल तसेच, जर एखाद्या कोरोनाव्हायरस ग्रस्त व्यक्तीने दुसऱ्या वृद्ध व्यक्तीला असुरक्षित केल असेल किंवा या व्यक्तिमुळे त्याला कोरोनाची लागण झाल्यास 'हेतुपूर्वक खून' केल्याचा आरोप केला जाऊ शकतो आणि 21 वर्षांपर्यंत तुरुंगात घालवू शकतो, असा इल सोलेचा अहवाल आहे. दरम्यान, ब्राझील, कॅनडा आणि अमेरिका असे अनेक देशांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अमेरिकेत कोरोनामुळे आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी स्वत:ला घरातच कोंडून घेतलं आहे. याबाबत त्यांच्या कार्यालयातून माहिती देण्यात आली आहे.
First published:

Tags: Corona, Corona virus, Corona virus in india

पुढील बातम्या