मराठी बातम्या /बातम्या /देश /त्रिपुरातील त्या घटनेमुळे महाराष्ट्रात तणाव; गृह मंत्रालयाने सांगितलं प्रकरणाचं सत्य

त्रिपुरातील त्या घटनेमुळे महाराष्ट्रात तणाव; गृह मंत्रालयाने सांगितलं प्रकरणाचं सत्य

गृह मंत्रालयानं गोमची जिल्ह्यातील काकराबन परिसरात मशिदीवर झालेल्या हल्ल्याची बातमी पूर्णपणे खोटी आणि चुकीची असल्याचं सांगितलं आहे.

गृह मंत्रालयानं गोमची जिल्ह्यातील काकराबन परिसरात मशिदीवर झालेल्या हल्ल्याची बातमी पूर्णपणे खोटी आणि चुकीची असल्याचं सांगितलं आहे.

गृह मंत्रालयानं गोमची जिल्ह्यातील काकराबन परिसरात मशिदीवर झालेल्या हल्ल्याची बातमी पूर्णपणे खोटी आणि चुकीची असल्याचं सांगितलं आहे.

नवी दिल्ली 14 नोव्हेंबर : त्रिपुरामधील हिंसेच्या घटनांबद्दल (Tripura Violence) सोशल मीडियावर चुकीचं वृत्त पसरवलं जात आहे (Tripura Violence Fake News on Social Media). त्रिपुरातील या घटनेचा परिणाम महाराष्ट्रातही उमटत असल्याचं दिसत आहे (Protests in Maharashtra Against Tripura Violence). याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयानं (MHA) मशिदीमध्ये झालेल्या तोडफोडीच्या एका वृत्ताचं खंडन केलं आहे. गृह मंत्रालयानं गोमची जिल्ह्यातील काकराबन परिसरात मशिदीवर झालेल्या हल्ल्याची बातमी पूर्णपणे खोटी आणि चुकीची असल्याचं सांगितलं आहे.

मणिपूरमध्ये अतिरेकी हल्ला, रायफल अधिकाऱ्याच्या पत्नी आणि मुलासह 7 जवान शहीद

गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गोमती जिल्ह्यातील काकरबन येथील मशिदीवर हल्ला करून तेथे तोडफोड केली गेली, असं वृत्त समोर आलं आहे. मात्र ही बातमी चुकीची असून तथ्य चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले आहे. त्रिपुरा पोलीस गोमती जिल्ह्यात शांतता आणि सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

गृह मंत्रालयाने सांगितले की, यापूर्वी देखील त्रिपुरातील कोणत्याही मशिदीचं नुकसान झाल्याचं वृत्त नाही. गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अनेक सोशल मीडिया पोस्टमध्ये त्रिपुरामध्ये हल्ले, बलात्कार आणि हत्या झाल्याचा आरोप करण्यात आला आहे, परंतु अशी कोणतीही घटना घडलेली नाही. गृह मंत्रालयाने लोकांना शांतता राखण्याचे तसेच फेक न्यूजपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

त्रिपुरात जे घडलंच नाही, त्याची प्रतिक्रिया दुर्दैवी! - फडणवीस

त्रिपुरातील हिंसाचाराच्या वृत्तांदरम्यान महाराष्ट्रात सुरू असलेल्या निदर्शनांबद्दल गृह मंत्रालयानं म्हटले आहे की शांतता आणि सौहार्द भंग करण्याच्या उद्देशाने त्रिपुराशी संबंधित खोट्या बातम्यांबाबत महाराष्ट्रात हिंसाचार आणि बेजबाबदार विधाने दिसून आली आहेत. हे अतिशय चिंताजनक आहे आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीत शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करतो.

First published:
top videos

    Tags: Fake news, Violence