जाहिरात
मराठी बातम्या / देश / Breaking News: मणिपूरमध्ये अतिरेकी हल्ला, रायफल अधिकाऱ्याच्या पत्नी आणि मुलासह 7 जवान शहीद

Breaking News: मणिपूरमध्ये अतिरेकी हल्ला, रायफल अधिकाऱ्याच्या पत्नी आणि मुलासह 7 जवान शहीद

Breaking News: मणिपूरमध्ये अतिरेकी हल्ला, रायफल अधिकाऱ्याच्या पत्नी आणि मुलासह 7 जवान शहीद

मणिपूरमध्ये आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर आणि त्यांच्या कुटुंबावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मणिपूर, 13 नोव्हेंबर: मणिपूरमध्ये आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर आणि त्यांच्या कुटुंबावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. शनिवारी सकाळी 10 वाजता शेखन-बेहियांग पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा हल्ला झाला. मिळालेल्या माहितीनुसार, 46 आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर आपल्या कुटुंबासह क्यूआरटी जात होते. तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला.

जाहिरात

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्यूआरटीमध्ये तैनात कमांडिंग ऑफिसर आणि 7 सैनिकांची पत्नी आणि एका मुलाचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, सध्या यासंदर्भात लष्कराकडून अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. हेही वाचा-  T20 World Cup Final: इंग्लंडला हरवणाऱ्या क्रिकेटपटूचा ऑस्ट्रेलियाला इशारा, म्हणाला…   मणिपूरचे मुख्यमंत्री नॉन्गथोम्बम बिरेन सिंग यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आणि असे भ्याड कृत्य सहन केलं जाणार नाही असे सांगितलं. दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत. हे अमानुष आणि दहशतवादी कृत्य असल्याचं ते म्हणाले. इंग्लिश न्यूज चॅनल  India Todayने दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या सूत्रांनी सांगितलं की, ‘क्विक रिअ‍ॅक्शन टीमसोबत अधिकाऱ्याचे कुटुंबीयही ताफ्यात होते. जीवितहानी होण्याची भीती आहे. अजूनही मोहीम सुरूच आहे. अजून माहितीची वाट पाहत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: assam
  • First Published :
जाहिरात
जाहिरात