मुंबई, 13 नोव्हेंबर: त्रिपुरात जे (Devendra Fadanvis blaims state government for incident in Amaravati) घडलंच नाही, त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटणं हे दुर्दैवी असून हिंदूंची दुकानं जाळणाऱ्यांवर सरकारनं कडक कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्रिपुरातील काही घटनांच्या केवळ अफवांच्या जोरावर महाराष्ट्रातील (Reaction of the incident which never happened) हिंदू दुकानदारांची दुकानं जाळली जात असतील, तर सरकारनं अशा समाजकंटकांना धडा शिकवण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
त्रिपुरात ज्या घटना घडल्याच नाहीत, त्यावर महाराष्ट्रात प्रतिक्रिया दुर्दैवी, हे सुनियोजित षडयंत्र!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 13, 2021
अमरावतीमधील घटनाक्रम अस्वस्थ करणारा, हिंदूंची दुकाने जाळली गेली!
राज्य सरकारमधील मंत्रीच जर भावना भडकावित असतील, तर हे अधिकच गंभीर!
शांतता पाळावी, हे माझे सर्वांना आवाहन आहे ! pic.twitter.com/s28YJiuqRy
काय म्हणाले फडणवीस? त्रिपुरामध्ये जी घटना घडलीच नाही, त्याची प्रतिक्रिया म्हणून महाराष्ट्रात मोर्चे निघत आहेत. वास्तविक, त्रिपुरामध्ये मशीद जाळल्याची केवळ अफवा पसरली आहे. प्रत्यक्षात असं काहीही घडलं नसल्याचं त्रिपुरा सरकारनं आणि त्रिपुरा पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. त्याचे पुरावे देणारे फोटोदेखील जाहीर करण्यात आले आहेत. एवढं सगळं स्पष्टीकरण देऊनही जर असे मोर्चे निघणार असतील आणि निष्पाप हिंदूंची दुकानं जाळली जाणार असतील, तर सरकारनं कारवाई करण्याची गरज असल्याचं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. सरकारमधील मंत्रीच लावतायत फूस सरकारमधील मंत्रीच जर जनतेला शांत करण्याऐवजी फूस लावण्याची भूमिका घेत असतील, तर दंगलींचा आळ सरकारवर येईल, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. जी घटनाच घडली नाही, त्याची प्रतिक्रिया म्हणून महाराष्ट्रात हिंसाचार आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचा संशय येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे वाचा- ब्रिटीशांची COVAXIN ला मान्यता, कोट्यवधी भारतीयांना दिलासा शांतता पाळण्याचं आवाहन महाराष्ट्रात सर्वांनी शांतता पाळावी, असं आवाहन फडणवीस यांनी केलं आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्यासाठी आणि राष्ट्रपती राजवट लावण्याची संधी मिळण्यासाटीच अशा दंगली भडकावल्या जात असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्रिपुरातील प्रकारावरून महाराष्ट्रात उमटत असलेल्या प्रतिक्रियांवरून आता जोरदार राजकारण तापायला सुरुवात झाली असून विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष एकमेकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू पाहत असल्याचं चित्र आहे.