नवी दिल्ली, 5 ऑगस्ट: कोरोना व्हायरसची (Coronavirus In India) तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाज (Coronavirus third wave) व्यक्त केला जात आहे. त्यातच रक्षाबंधन (Raksha Bandhan), गणेशोत्सव (Ganesh Chaturthi) असे विविध सणउत्सव जवळ आले आहेत. सण-उत्सव साजरा करण्यासाठी अनेकजण हे आपल्या मूळगावी जात असतात. या सर्व पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या राज्यांनी आपल्या राज्यांत इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी (Covid Restrictions) नियमावली (Covid-19 lockdown new rules) निश्चित केली आहे. काही राज्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी (Travel restrictions) आरटी-पीसीआर (RT-PCR test) चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक आहे, तर काही राज्यांमध्ये प्रवेश करताना कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली असल्याचे प्रमाणपत्र (covid-19 vaccine certificate) गरजेचे आहे. चला तर मग, कोणत्या राज्यात प्रवेश करताना आरटी-पीसीआर चाचणी रिपोर्ट आवश्यक आहे, व कोणत्या राज्यात लसीकरण प्रमाणपत्र हे जाणून घेऊयात.
छत्तीसगडमध्ये विमानाने येणाऱ्या प्रवाशांनी विमान प्रवास सुरू करण्याच्या वेळेपूर्वी 96 तासांच्या आत केलेल्या आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत ठेवणे अनिवार्य आहे. छत्तीसगड सरकारने मंगळवारी तसा निर्णय घेतला आहे.
15 दिवस धोक्याचे! छोटीशीही चूक करू नका, मोदी सरकारने उद्धव ठाकरेंना केलं अलर्ट
कर्नाटक सरकारने केरळ आणि महाराष्ट्र येथून राज्यात येणाऱ्या नागरिकांना आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत ठेवणे बंधनकारक केले आहे.
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे हिमाचल प्रदेश सरकारने राज्यामध्ये प्रवेश करणाऱ्या पर्यटकांना आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य केला आहे. हा रिपोर्ट 72 तासांपूर्वीचा असावा. जर कोरोना लसीचे एक किंवा दोन्ही डोस घेतले असतील, तर लसीकरण प्रमाणपत्र घेऊन हिमाचल प्रदेशमध्ये प्रवेश करता येईल.
5 ऑगस्टपासून केरळमधून तामिळनाडूत येणाऱ्यांना आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह रिपोर्ट सोबत असेल तरच चेन्नईला येता येईल. राज्यामध्ये कोणत्याही वाहनाने (विमान, रेल्वे, बस, खासगी वाहन आदी) प्रवेश करायचा असेल तरी आरटी-पीसीआर चाचणीचा रिपोर्ट हा अनिवार्य करण्यात आला आहे.
केरळ राज्यातून गोव्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणीचा रिपोर्ट सक्तीचा करण्यात आला आहे.
दुर्दैवी! आज तिचं यश साजरं करायला सोबत नाहीत आई-बाबा; वाचून डोळ्यांत येईल पाणी
पुणे, मुंबई आणि चेन्नई येथून येणाऱ्या प्रवाशांसाठी पश्चिम बंगाल सरकारने आरटी-पीसीआर चाचणीचा रिपोर्ट अनिवार्य केला आहे.
आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, चंदीगड, हरियाणा राज्यात प्रवेश करण्यासाठी कोरोना चाचणी निगेटिव्ह रिपोर्ट सोबत बाळगण्याची आवश्यकता नाही.
कोरोना लसीचा एक डोस घेतलेल्या प्रवाशांना राज्यस्थान आणि नागालँड राज्यात कोरोना चाचणी निगेटिव्ह रिपोर्टची आवश्यकता नाही.
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीला छत्तीसगड, मणिपूर, ओडिशा, त्रिपुरा, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि मेघालयामध्ये प्रवेश करताना कोरोना निगेटिव्ह रिपोर्टची आवश्यकता नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Lockdown, Raksha bandhan