जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / 'हे 15 दिवस धोक्याचे! छोटीशीही चूक करू नका', मोदी सरकारने उद्धव ठाकरेंना केलं अलर्ट

'हे 15 दिवस धोक्याचे! छोटीशीही चूक करू नका', मोदी सरकारने उद्धव ठाकरेंना केलं अलर्ट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई ते हैद्राबाद, पुणे ते औरंगाबाद हाय स्पीड रेल्वे मार्गाबाबत महत्त्वाची बैठक घेतली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई ते हैद्राबाद, पुणे ते औरंगाबाद हाय स्पीड रेल्वे मार्गाबाबत महत्त्वाची बैठक घेतली.

या 15 दिवसांसाठी कडक निर्बंध लागू करावेत, असे निर्देश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 04 ऑगस्ट :  कोरोनाची तिसरी लाट (Corona third wave) याच महिन्यात येणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यात आता देशात सणासुदीचा (Corona cases will increase during festival) काळही सुरू होतो. त्यामुळे देशातील कोरोनाची परिस्थिती भयंकर होण्याची भीती आहे. याच पार्श्वभूमीवर आता मोदी सरकारने (Modi government) राज्य सरकारला सावध केलं आहे. 19 ऑगस्टपासून 15 ऑक्टोबरपर्यंत 15 दिवस धोक्याचे आहेत. हे 15 दिवस अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या दिवसात कडक निर्बंध लागू करण्याचे (Corona guidelines during festival) आदेश केंद्राने राज्यांना दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिवांनी (Health s ecretary)  सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र दिलं आहे. ज्यामध्ये सणासुदीचा कालावधी लक्षात घेता राज्यांना काही निर्देश देण्यात आले आहे. हे वाचा -  2 महिने प्रतीक्षेची गरज नाही; मुंबईकरांना 2-4 दिवसांतच समजणार कोरोनाचं बदलतं रूप पत्रात नमूद केल्यानुसार या कालावधीत  सण, उत्सव लक्षात घेता गर्दी होण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात गर्दी जमा होणार नाही, याची दक्षता राज्यांनी घ्यावी. कोरोना नियमांचं पालन झालं पाहिजे. राज्यांनी स्थानिक स्तरांवर आवश्यक ते निर्बंध लागू करावेत. जेणेकरून गर्दी जमा होणार नाही. एक छोटीशी चूकही संसर्ग पसरण्याचं मोठं कारण ठरू शकते. ते 15 दिवस कोणते? 19 ऑगस्ट : मोहरम 21 ऑगस्ट : ओणम 30 ऑगस्ट : जन्माष्टमी 10 सप्टेंबर : गणेश चतुर्थी 5 ते 15 ऑक्टोबर : दुर्गा पूजा ऑगस्ट महिन्यातच कोरोनाची तिसरी लाट याच महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता शास्त्रज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे देशात दिवसाला जवळपास एक लाखाहून अधिक रुग्ण आढळण्याची (Daily 1 lac corona cases) शक्यता आहे. बिकट परिस्थितीत हा आकडा अडीच लाख इतका वाढण्याची शक्यता आहे. हे वाचा -  सावधान! कोरोनाची दुसरी लाट अजूनही संपलेली नाही; ‘हे’ राज्य वाढवतायेत चिंता तज्ज्ञांच्या मते, ऑगस्ट महिन्यात सुरू झालेली कोरोना विषाणूची तिसरी लाट ऑक्टोबर महिन्यात अत्यंत भयंकर असू शकते. त्यामुळे यंदाही गणपती आणि दिवाळी कोरोना विषाणूच्या सावटाखाली असणार आहे. दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेची झालेली अवस्था पाहता, तिसरी लाटेनंही असचं थैमान घातलं तर देशापुढे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. हैदराबाद आणि कानपूरच्या आयआयटीमधील संशोधक मथुकुमल्ली विद्यासागर आणि मनींद्र अग्रवाल यांनी याबाबतचं संशोधन केलं आहे. गणितीय मॉडेलचा वापर करून देशात कोरोना स्थिती काय असेल, याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात