नवी दिल्ली, 19 मे : देशात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनचा चौथा टप्पा जाहीर करण्यात आला आहे. दुसरीकडे परराज्यात अडकलेले मजूर मोठ्या संख्येने आपल्या गावी परतत आहेत. त्यामुळं इंडियन कॉउन्सिल ऑफ मेडिलक रिसर्चनं (ICMR) कोरोना तपासणीच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहे. आता प्रवासी मजूर, रुग्णालयात असलेले कोरोना रुग्ण आणि फ्रंट लाइनवर काम करणारे लोकांच्या तपासणीसाठी नियमाद बदल करण्यात आले आहेत. काय आहे बदल? »ICMRने सोमवारी सांगितले की प्रवासी आणि घरी परतणाऱ्या लोकांमध्ये जर इन्फ्लूएन्झा सारख्या आजाराची लक्षणं दिसली तर सात दिवसांच्या आत त्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. » रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांना किंवा फ्रंट लाइनवर काम करणाऱ्यांमध्ये इन्फ्लूएन्झा सारख्या रोगाचे (ILI) लक्षणं दिसल्यास त्यांची ही RT-PCR चाचणी केली जाणार. » याव्यतिरिक्त, एखाद्या संक्रमित रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या आणि अंत्यत गंभीर परिस्थिती राहणाऱ्यांना, ज्यांना लक्षणं दिसत नाहीत, यांच्यावर संपर्कात आल्यानंतर पाचव्या आणि दहाव्या दिवसाच्या दरम्यान तपासणी केली जाईल. आतापर्यंत अशा प्रकरणांची पाचव्या आणि 14 व्या दिवसा दरम्यान एकदा चौकशी केली जात आहे. वाचा- कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी लोकांनी केला अजब जुगाड, पाहा PHOTO का केले बदल? ICMRने देशात वाढणारी कोरोनाची प्रकरणं लक्षात घेता आपल्या रणनीतीमध्ये काही बदल केले आहे. नव्या रणनीतीचे उद्देश संक्रमण आणि प्रसार ऱोखणे आहे. वाचा- आजपासून पुण्यातलं सगळ्यात मोठं मार्केट बंद, कोरोनाच्या उद्रेकामुळे निर्णय भारतात कोरोनाचा आकडा वाढताच देशात सोमवारी कोरोनामुळं मृत झालेल्या लोकांची एकूण संख्या 3029 झाली. तर, कोरोनाबाधितांचा आकडा आता 96 हजार 169वर जाऊन पोहचला आहे. रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 5242 नवीन प्रकरणं समोर आली होती. तर, 157 लोकांचा मृत्यू झाला होता. वाचा- भारतात कोरोनाबाधितांची संख्या 1 लाखांच्या जवळ, जगातला 7वा देश ठरणार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.