मराठी बातम्या /बातम्या /पुणे /आजपासून पुण्यातलं सगळ्यात मोठं मार्केट बंद, कोरोनाच्या उद्रेकामुळे निर्णय

आजपासून पुण्यातलं सगळ्यात मोठं मार्केट बंद, कोरोनाच्या उद्रेकामुळे निर्णय

लॉकडाऊन 4 दरम्यान केंद्र सरकारनं आता रेड, ऑरेंज, ग्रीन झोन निश्चित करण्याचा निर्णय राज्य सरकारवर सोडला आहे. तसंच बफर आणि कंटेनमेंट झोन देखील तयार केले गेले आहेत.

लॉकडाऊन 4 दरम्यान केंद्र सरकारनं आता रेड, ऑरेंज, ग्रीन झोन निश्चित करण्याचा निर्णय राज्य सरकारवर सोडला आहे. तसंच बफर आणि कंटेनमेंट झोन देखील तयार केले गेले आहेत.

काही व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे 18 मे : कोरोनाचा उद्रेक पुण्यात मोठ्या प्रमाणावर झाला आहे. काही व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता पुणे गुलटेकडी मार्केटमधील भुसार विभागही बंद होणार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारपासून हे मार्केट काही दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे पुण्याच्या पूर्ण बाजारपेठेवरच त्याचा परिणाम होणार आहे. काही व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

मंगळवारपासून भुसारविभागही बंद ठेवण्याचा निर्णय पुणे मर्चंट चेंबर्सने घेतला होता. खरेदीदारांनी भीतीपोटी मार्केटमध्ये गर्दी करू नये असं आवाहन मार्केट कमिटी प्रशासक बी. जी देशमुख यांनी केलं आहे.

भाजी मार्केटचे सध्या फक्त उपबाजार सुरू आहेत. पुणे गुलटेकडी मार्केटयार्ड रेड झोनमध्ये असल्याने तेही सध्या बंद आहेत. लोक गर्दी करत नियमांचं पालन करत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मार्केट पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासनही प्रशासक देशमुख यांनी दिलंय.

दरम्यान,  पुणे शहर आणि परिसरात दररोज कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. अशा रूग्णांना विविध सेवा पुरविण्यासाठी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आयटीआय विभागाने रिमोट कंट्रोलवर आधारित एका रोबोची निर्मिती केली आहे. इतकंच नाही तर ऑटोमटिक सॅनिटायजर वेंडिग मशीन आणि ऑटो कोरोना लक्षणांची चाचणी करणारा रोबोदेखील तयार केला आहे.

15 वर्षाच्या मुलाने कोरोनाला हरवलं, मात्र डायलेसिस न केल्याने गमावला जीव

कोरोनाची प्राथमिक तपासणी करण्यासाठी एक विशिष्ट चालता बोलता रोबोच पुणे कॅन्टॉनमेंटच्या आयटीआयने विकसित केला आहे. यामुळे कोरोनाचे प्राथमिक निदान होण्यास मदत होणार आहे. हा चालता बोलता रोबोट नागरिकांचे स्क्रींनिग अगर तपासणीच करून थांबणार आहे, असे नाही. तर तो नागरिकांना आरोग्याबाबतचे विविध प्रश्न देखील विचारणार आहे. त्यासाठी खास वेगळी यंत्रणा या रोबोमध्ये विकसित करण्यात आली आहे.

'तेव्हा डॉक्टरांनी मुलीला सांगितलं.. 70 टक्के केस हातातून गेली आहे'

 रोबोटने विचारलेल्या प्रश्नांवर नागरिकांनी उत्तरे दिल्यानंतर संबधित रूग्णांस कोरोना वॉर्डमध्ये दाखल करावयाचे की, विलगीकरण कक्षात ठेवायचे याचा निर्णय रूग्णालयातील डॉक्टर घेणार आहेत. पहिल्या टप्प्यात हा रोबोट रूग्णालयातील कॅज्युअल्टीमध्ये बसविण्यात येणार आहे. रोबोट चालता बोलता होण्यासाठी संगणकीकृत यंत्रणा बसविण्यात आली असून, नागरिकांच्या शरीराचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटरची सोय करण्यात आली आहे.

First published: