जाहिरात
मराठी बातम्या / देश / भारतात कोरोनाबाधितांची संख्या 1 लाखांच्या जवळ, जगातला  7वा देश ठरणार

भारतात कोरोनाबाधितांची संख्या 1 लाखांच्या जवळ, जगातला  7वा देश ठरणार

तर देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 63.54 एवढं आहे. मृत्यू दर आणि बरे होण्याचं प्रमाण हे इतर देशांच्या तुलनेत चांगलं आहे.

तर देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 63.54 एवढं आहे. मृत्यू दर आणि बरे होण्याचं प्रमाण हे इतर देशांच्या तुलनेत चांगलं आहे.

नवी दिल्ली 18 मे: भारतात कोरोना व्हायरस बाधितांच्या (Coronavirus) संख्येने 96 हजारांचा आकडा पार केला आहे. असाच वेग राहिला तर भारत लवकरच १ लाखांचा आकडा पार करेल. असं झालं तर भारताचा जगातल्या त्या ११ देशांमध्ये समावेश होईल जिथे १ लाखांपेक्षा जास्त बाधित आहेत. पण Active रुग्ण असलेल्या ७ देशांमध्येही भारताचा समावेश होणार आहे. स्पेन (Spain), इराण (Iran)सह फक्त चार देशांमध्येच भारतापेक्षा जास्त रुग्ण आहेत. मात्र तिथे Active रुग्णांची संख्या कमी आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 18 मे: भारतात कोरोना व्हायरस बाधितांच्या (Coronavirus) संख्येने   96 हजारांचा आकडा पार केला आहे. असाच वेग राहिला तर भारत लवकरच १ लाखांचा आकडा पार करेल. असं झालं तर भारताचा जगातल्या त्या ११ देशांमध्ये समावेश होईल जिथे १ लाखांपेक्षा जास्त बाधित आहेत. पण Active रुग्ण असलेल्या ७ देशांमध्येही भारताचा समावेश होणार आहे.  स्पेन (Spain), इराण (Iran)सह फक्त चार देशांमध्येच भारतापेक्षा जास्त रुग्ण आहेत. मात्र तिथे Active रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे सरकारची काळजी वाढली असून सरकार तयारीला लागलं आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचं थैमान काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. राज्यात आज तब्बल 2033 नवे रुग्ण आढळले असून यामध्ये राजधानी मुंबईतील 1185 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातही राज्यातील स्थिती नियंत्रणात येत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 21 हजारांवर गेली आहे. शहरात आज कोरोनामुळे 23 लोकांचा मृत्यू झाला असून आजवर मुंबईत एकूण 757 जणाचा मृत्यू झाला आहे.तर आज 504जण कोरोनामुक्त झाले असून आजवर मुंबईतील 5516 पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आकडेवारी राज्यात 51 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमध्ये 23, नवी मुंबईमध्ये 8, पुण्यात 8, जळगावमध्ये 3, औरंगाबाद शहरात 2, अहमदनगर जिल्ह्यात 2,नागपूर शहरात 2, भिवंडी 1 तर पालघरमध्ये 1 मृत्यू झाला आहे. या शिवाय बिहार राज्यातील 1 मृत्यू मुंबईत झाला आहे. मृत्यूंबद्दल डिटेल्स – आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 35 पुरुष तर16 महिला आहेत. आज झालेल्या 51 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 21 रुग्ण आहेत तर 19 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 11 जण 40 वर्षांखालील आहे. या 51 रुग्णांपैकी 35 जणांमध्ये ( 68%) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 1249 झाली आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 2, 82, 194 नमुन्यांपैकी 2, 47, 103 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 35, 058 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात