Home /News /national /

चिंताजनक! काश्मीरच्या 60 टक्के भागात पसरलंय दहशतवाद्यांचं नेटवर्क, करतायेत ही कामं

चिंताजनक! काश्मीरच्या 60 टक्के भागात पसरलंय दहशतवाद्यांचं नेटवर्क, करतायेत ही कामं

ओजीडब्ल्यू केवळ दहशतवाद्यांना माहिती पुरवण्याचं काम करत नाहीत, तर त्यांचे संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचवण्यासाठी आणि लॉजिस्टिकल सपोर्टसाठीदेखील काम करतात

    नवी दिल्ली 12 ऑक्टोबर : जम्मू -काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) दहशतवाद्यांसाठी काम करणाऱ्या ओव्हर ग्राउंड वर्कर्सचं (ओजीडब्ल्यू) जाळं सुरक्षा दलांसाठी मोठं आव्हान बनलं आहे. दहशतवाद्यांनी काश्मीरमधील अल्पसंख्याकांना लक्ष्य केल्यानंतर (Terrorist Attacks on Civilians in JK) दहशतवाद्यांचे हे शेकडो मदतनीस पकडले गेले आहेत. मात्र, त्यांचे जाळे काश्मीरच्या सुमारे 60 टक्के भागात पसरलेले आहे. अशा तळागाळातील कामगारांची संख्या सात हजारांहून अधिक आहे. Breaking News: पूँछमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक, 5 भारतीय जवान शहीद ओजीडब्ल्यू केवळ दहशतवाद्यांना माहिती पुरवण्याचं काम करत नाहीत, तर त्यांचे संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचवण्यासाठी आणि लॉजिस्टिकल सपोर्टसाठीदेखील काम करतात. गुप्तचर संस्थेच्या अहवालात ओजीडब्ल्यूच्या नवीनतम हालचालींची माहिती देताना असे सांगण्यात आले आहे, की ते दहशतवाद्यांना सुरक्षा दलांची माहिती पुरवतात. पैसे इकडून तिकडे पोहोचवणे आणि सुरक्षित आश्रयस्थानांची व्यवस्था करणे, अशी कामंही ती करतात. गुप्तचर संस्थांच्या अहवालात म्हटलं आहे, की OGW नेटवर्क दक्षिण काश्मीरमध्ये खूप मजबूत आहे परंतु ते काश्मीरच्या जवळजवळ सर्व भागात आहे. कधीकधी ते दहशतवाद्यांच्या भीतीमुळे मदतीसाठी तयार होतात. परंतु ताज्या प्रकरणांमध्ये, कट्टरतावादामुळे अनेक तरुण या नेटवर्कमध्ये सामील झाले आहेत. ते सामान्य लोकांमध्ये राहून काम करतात, त्यामुळे त्यांच्यावर सहजासहजी संशय येत नाही. काश्मीरमध्ये मोठी कारवाई; लष्कर-ए-तोयबासह टीआरएफच्या 900 हून अधिक मदतगारांना अटक कलम 370 रद्द केल्यानंतरही मोठ्या संख्येने OGWs ला अटक करण्यात आली. परंतु अनेक लोकांना प्रतिज्ञापत्रानंतर सोडण्यात आले. गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवाद्यांची नवीन रणनीती पाहता गुप्तचर संस्थांच्या इनपुटवर सुरक्षा यंत्रणा पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. सुरक्षा एजन्सी, सीआरपीएफ, जम्मू -काश्मीर पोलिसांव्यतिरिक्त एनआयए हे दहशतवादी नेटवर्क मोठ्या प्रमाणावर नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र हे फार सोपं काम नसल्याचं मानलं जात आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Jammu and kashmir, Terror group, Terrorist attack

    पुढील बातम्या