श्रीनगर, 11 ऑक्टोबर: एक मोठी बातमी समोर येतेय. जम्मू- काश्मीरमध्ये (Jammu Kashmir Encounter) भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवादी (Terrorist Attack)मोठी चकमक झाली आहे. या चकमकीत जेसीओसह पाच जवान शहीद झालेत. पूँछ जिल्ह्यात ही चकमक झाली आहे. जम्मू -काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यातील डेरा की गली भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक जेसीओसह पाच जवान शहीद झाले. सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घातला असून सध्या चकमक सुरू आहे.
One JCO & 4 jawans of Indian Army sustained critical injuries during the anti-terror operation in Poonch, J&K today. They were rushed to the nearest medical facility where they succumbed to injuries: Defence PRO, Jammu https://t.co/FKjto71CZ7
— ANI (@ANI) October 11, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास 4 दहशतवाद्यांनी सीमा पार करुन पूँछला जिल्ह्यात घुसखोरी केली होती. त्यानंतर हे दहशतवादी काश्मीर खोऱ्याच्या दिशेनं रवाना झाले. भारतीय सुरक्षा दलानं मुगल रोडजवळील डेरा की गली परिसरात या चार दहशतवाद्यांना घेरलं, त्यानंतर भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरु झाला. या चकमकीत पाच सैनिक गंभीररित्या जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्याआधीच पाचही जवानांचा मृत्यू झाला. हेही वाचा- अनिल देशमुख यांच्या मुलाला होणार अटक? CBI चं पथक घरी पोहोचलं अजूनही परिसरात चकमक सुरु असल्याचं वृत्त आहे. यासह सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून सर्च ऑपरेशन सुरु आहे. सकाळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा याआधी जम्मू- काश्मीरच्या अनंतनाग आणि बांदीपोरामध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलानं दोन दहशतवाद्यांना (Terrorists) ठार केलं. रविवारी रात्री उशिरा अनंतनागच्या खाहगुंड भागात सुरक्षा दलांना दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलानं केलेल्या सर्च ऑपरेशनदरम्यान झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. या चकमकीत एक जम्मू काश्मीर पोलीस कर्मचारी जखमी झाला. हेही वाचा- ठाण्यात शिवसेनेची गुंडगिरी, रिक्षावाल्यांना मारहाण करतानाचा Live Video दुसरी चकमक बांदीपोराच्या हाजिन भागातील गुंड जहांगीरमध्ये झाली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्च ऑपरेशन राबवलं. त्याच दरम्यान चकमक सुरु झाली. या चकमकीतही एक दहशतवादी ठार झाला. या दहशतवाद्याचं नाव इम्तियाज अहमद डार असं असून तो दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाचा दहशतवादी होता.