मराठी बातम्या /बातम्या /देश /जम्मू-काश्मीरमध्ये मोठी कारवाई; लष्कर-ए-तोयबासह टीआरएफच्या 900 हून अधिक मदतगारांना अटक

जम्मू-काश्मीरमध्ये मोठी कारवाई; लष्कर-ए-तोयबासह टीआरएफच्या 900 हून अधिक मदतगारांना अटक

या आठवड्याच्या सुरुवातीला टीआरएफने व्यापारी काश्मिरी पंडित (Kashmiri Pandit) मखनलाल बिंद्रू(68) आणि इतर दोन नागरिकांची त्यांच्या दुकानावर गोळीबार करून हत्या केली होती

या आठवड्याच्या सुरुवातीला टीआरएफने व्यापारी काश्मिरी पंडित (Kashmiri Pandit) मखनलाल बिंद्रू(68) आणि इतर दोन नागरिकांची त्यांच्या दुकानावर गोळीबार करून हत्या केली होती

या आठवड्याच्या सुरुवातीला टीआरएफने व्यापारी काश्मिरी पंडित (Kashmiri Pandit) मखनलाल बिंद्रू(68) आणि इतर दोन नागरिकांची त्यांच्या दुकानावर गोळीबार करून हत्या केली होती

  श्रीनगर 11 ऑक्टोबर : जम्मू-काश्मीरमधील काश्मीर खोऱ्यात (Kahsmir) विशिष्ट समुदायाला लक्ष्य करून मारण्याच्या घटना वाढल्या आहेत. लष्कर-ए-तोयबासारखीच (LET) द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) ही संघटना या दहशतवादी कारवाया करत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राखीव पोलीस दल आणि काश्मीर पोलिसांनी रविवारी अनेक ठिकाणे छापे टाकत लष्कर-ए-तोयबा (LET), जैश-ए-मोहम्मद (JEM), अल-बद्र आणि द रेझिस्टन्स फ्रंटच्या (TRF) 900 हून अधिक मदतगारांना ताब्यात घेतलं. खोऱ्यात आतापर्यंत झालेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे.

  विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 ला दिलेल्या माहितीनुसार, या 900 व्यक्ती आता राष्ट्रीय तपासणी यंत्रणा अर्थात एनआयए (NIA) आणि जम्मू -काश्मीर पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांच्या नावांची यादी वेगवेगळ्या एजन्सींनी दिली होती. सीमेपलीकडील दहशतवादी गटांना खोऱ्यातील या दहशतवादी संघटना पाठिंबा देत असून विशिष्ट अल्पसंख्याक समुदायाला (Minority Community) लक्ष्य करून ठार मारण्याच्या घटनांचे प्रमाण वाढलं आहे. त्याचा शोध घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. या लोकांच्या चौकशीमधून अशा घटनांच्या मागचे कारण आणि कार्यपद्धती तपास यंत्रणांना जाणून घ्यायची आहे, असंही सूत्रांनी सांगितलं.

  प्रियंका गांधींची हटके स्टाईल, महिला पोलिसाला मिठी मारत दिलं सरप्राईज

  हे 900 लोक म्हणजे स्थानिक रहिवासी असून ते अतिरेक्यांना रसद पुरवणं आणि अन्य मदत करतात. लक्ष्य करून ठराविक समुदायाच्या लोकांची हत्या करण्यासाठी लष्कर-ए-तोयबाच्या टीआरएफ या संघटनेसाठी हे लोक काम करतात. या कारवाईमुळे या दहशतवादी संघटनांना मिळणारी स्थानिक पातळीवरील मदत बंद होईल. लवकरच या दहशतवाद्यांचा बिमोड करण्यात येईल, असं एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर न्यूज 18 ला सांगितलं.

  या आठवड्याच्या सुरुवातीला टीआरएफने व्यापारी काश्मिरी पंडित (Kashmiri Pandit) मखनलाल बिंद्रू(68) आणि इतर दोन नागरिकांची त्यांच्या दुकानावर गोळीबार करून हत्या केली होती. बिंद्रू यांच्या हत्येनंतर काही मिनिटांनंतर, दहशतवाद्यांनी बिहारमधील भागलपूरचा रहिवासी असलेल्या वीरेंद्र पासवान या भेळपुरी विक्रेत्याची गोळ्या घालून हत्या केली. त्याचवेळी, उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील नायडखई येथे स्थानिक टॅक्सी स्टँडचे अध्यक्ष मोहम्मद शफी लोन यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली.

  या झाडाला मिळतंय 24 तास संरक्षण, एक पानही गळलं तरी प्रशासनात उडते खळबळ

  ३० सप्टेंबर रोजी श्रीनगरमधील एका सरकारी शाळेत शिक्षक (Teachers) असलेल्या बडगामचे रहिवासी 46 वर्षीय सुपिंदर कौर आणि 39 वर्षीय दीपक चंद या दोन शिक्षकांची हत्या करण्यात आली होती. हे दोघेही शीख (Shikh) आणि हिंदू (Hindu) समुदायातील होते. सप्टेंबर महिन्यातच काश्मीरमध्ये सात नागरिक मारले गेले, त्यातील तीन हिंदू आणि काही शीख समाजातील आहेत.

  यातून काश्मीर खोऱ्यात होत असलेल्या हिंसाचाराच्या पद्धतीत बदल झालेला लक्षात येत असून, बिगर मुस्लिम आणि अल्पसंख्याक जम्मू-काश्मीरमध्ये स्वीकारले जाणार नाहीत, असा संदेश यातून दिला जात आहे. दहशतवादी गटांना नवीन अधिवास कायदा आणि निवडणूक प्रक्रिया मान्य नाही. त्यामुळे ते काश्मीरसाठी काम करणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील व्यक्तींना लक्ष्य करत आहेत, अशी माहिती एका विश्वसनीय सूत्राने न्यूज 18 ला दिली होती. दहशतवादाविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी भारतील सैन्यदलं कार्यरत आहेत.

  First published:

  Tags: Jammu and kashmir, Terror group