जाहिरात
मराठी बातम्या / देश / मातीचं घर, वडील मनोरुग्ण; हलाखीच्या परिस्थितीत पठ्ठ्याची 'NEET' मध्ये भरारी

मातीचं घर, वडील मनोरुग्ण; हलाखीच्या परिस्थितीत पठ्ठ्याची 'NEET' मध्ये भरारी

सूर्यप्रकाशच्या कुटुंबियांना दोन वेळचं जेवण मिळवण्यासाठीही तारेवरची कसरत करावी लागते.

सूर्यप्रकाशच्या कुटुंबियांना दोन वेळचं जेवण मिळवण्यासाठीही तारेवरची कसरत करावी लागते.

ही प्रेरणादायी कथा आहे राजस्थानच्या सूर्यप्रकाशची. ज्याने मेहनतीला कोणताही पर्याय नसतो आणि मेहनतीचं फळ मिळतंच, हे मोठ्या जिकरीने दाखवून दिलं.

  • -MIN READ Local18 Barmer,Rajasthan
  • Last Updated :

मनमोहन सेजू, प्रतिनिधी बारमेर, 17 जून : वडिलांची, आजोबांची मानसिक स्थिती ठीक नाही. घरची परिस्थिती हलाखीची, सगळा भार आईवर. पशुपालनातून घर चालतं…मात्र तरीही स्वतःला खचू दिलं नाही, अभ्यासात कधी खंड पडू दिला नाही आणि कठीण परीक्षांपैकी एक मानली जाणारी ‘नीट’ उत्तीर्ण होऊन भारतातून 2898वा क्रमांक मिळवला. ही प्रेरणादायी कथा आहे राजस्थानच्या सूर्यप्रकाशची. ज्याने मेहनतीला कोणताही पर्याय नसतो आणि मेहनतीचं फळ मिळतंच, हे मोठ्या जिकरीने दाखवून दिलं. सूर्यप्रकाशच्या कुटुंबियांना दोन वेळचं जेवण मिळवण्यासाठीही तारेवरची कसरत करावी लागते. दोन-तीन वर्षांपूर्वी ते मातीच्या एका खोलीत राहायचे. मात्र पीएम आवास योजनेतून त्यांना दोन खोल्यांचं घर बांधून मिळालं. अभ्यासात हुशार आणि विज्ञानाची आवड असूनही सूर्यप्रकाशने महाविद्यालयात विज्ञान शाखेतून नाही, तर परिस्थिती हलाखीची म्हणून कला शाखेतून प्रवेश घेतला. सुट्टीत तो दुकानांमध्ये, शेतात मजुरीची कामं करायचा. गुजरातमध्ये कपड्यांच्या कंपनीतही तो काम करायचा. नातेवाईकांच्या सांगण्यावरून त्याने महाविद्यालयात कला शाखेतून विज्ञान शाखेत प्रवेश घेतला.

News18लोकमत
News18लोकमत

आता नीट परीक्षा उत्तीर्ण होऊन सूर्यप्रकाशने आपल्या स्वप्नांच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं आहे. पुढेही त्याने अभ्यासात अशीच मेहनत केली, तर डॉक्टर होऊन त्याची परिस्थिती रातोरात बदलण्यास वेळ लागणार नाही. काय सांगता! इथं राहण्यासाठी सरकारच देत आहे 71 लाख; कुठे आणि कोणतं आहे हे ठिकाण पाहा दरम्यान, नीट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सूर्यप्रकाशाने सांगितलं, ‘माझे वडील डुंगराराम मनाने आजारी आहेत. मागील 15 वर्षांपासून जोधपूरच्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर, माझी आई गृहिणी आहे. केवळ पशुपालनावर आमचं घर चालतं. त्यामुळे मला अभ्यासासोबतच मजुरीही करावी लागायची. मात्र कधीही मी माझं लक्ष भरकटू दिलं नाही. नियमितपणे अभ्यास सुरूच ठेवला, ज्याचे परिणाम आपण पाहू शकता.’ हे बोलत असताना सूर्यप्रकाशचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात