जाहिरात
मराठी बातम्या / Viral / काय सांगता! इथं राहण्यासाठी सरकारच देत आहे 71 लाख; कुठे आणि कोणतं आहे हे ठिकाण पाहा

काय सांगता! इथं राहण्यासाठी सरकारच देत आहे 71 लाख; कुठे आणि कोणतं आहे हे ठिकाण पाहा

प्रतीकात्मक फोटो - Canva

प्रतीकात्मक फोटो - Canva

असं ठिकाण जिथं राहण्यासाठी सरकारच तुम्हाला पैसे देत आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

आयर्लंड, 17 जून :  तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं असेल, तिथं राहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी पैसे मोजावे लागतात. पण तुम्हाला कुणी एखाद्या ठिकाणी राहण्यासाठी पैसे दिले तर… काय आश्चर्य वाटलं ना? असं होऊच शकत नाही असं तुम्ही म्हणाल. पण तुम्हाला वाचून आणखी आश्चर्य वाटेल की अशी ऑफऱ दिली आहे ती सरकारने. एक असं ठिकाण जिथं राहण्यासाठी सरकार तुम्हाला पैसे देत आहे. तेपण थोडेथोडके नव्हे तर तब्बल 71 लाख रुपये. कोरोना महासाथ किंवा तत्सम आपत्तींमुळे अनेकदा अनेक क्षेत्रं रिकामी होतात. लोक ती जागा सोडून इतरत्र जातात. यामुळे त्या देशांचं सरकार त्या भागांचं पुनर्वसन करण्यासाठी खूप प्रयत्न करतात. अशाच एका देशातील अनेक बेटे रिकामी झाली आहे. त्यामुळे या बेटांवर इतर लोकांना स्थायिक करण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. ‘आमची राहता येण्यासारखी बेटे’ म्हणून सरकारने योजना सुरू केली आहे. ज्याअंतर्गत या बेटांवर राहायला येणाऱ्यांना सरकारच पैसे देणार आहे. अद्भुत! माऊंट एव्हरेस्टच्या टॉपवरून दिसतं असं दृश्य, पाहूनच थक्क व्हाल; Must Watch Video इथं अशी 30 बेटे आहेत, जिथं लोकांना राहता येईल. ही बेटे कोणत्याही पुलाद्वारे मुख्य देशाशी जोडलेली नाहीत. इथं लोक असावेत अशी सरकारची इच्छा आहे.  बेटांवरील लोकसंख्या वाढवणं, बेबंद आणि जीर्ण झालेल्या मालमत्तेची वाढती संख्या वाचवणं आणि पुनर्संचयित करणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. इथं राहण्यासाठी सरकार नागरिकांना 80 हजार युरो म्हणजेच 71 लाख रुपये देणार आहे. आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे. तर  रहिवाशांनी 1993 पूर्वी बांधलेल्या आणि किमान दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या बेटांवर मालमत्ता खरेदी करणं आवश्यक आहे. योजनेअंतर्गत दिलेला निधी इमारत बांधकाम कामासाठी वापरला जाऊ शकतो. Viral News: असं ठिकाण जिथे 24 तास असतो दिवस; सलग 70 दिवस सूर्यच मावळत नाही पण ही योजना नेमकी कुठे लागू आहे. ही योजना आयर्लंड सरकारने आणली आहे. 1 जुलैपासून योजनेसाठी अर्ज उपलब्ध होतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात