नीमच, 6 मे : अनेकजण प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशस्वी होतात. तसंच, अनेकजण मोठी स्वप्नं डोळ्यासमोर ठेवून जिद्दीने प्रयत्न करत असतात. या लोकांच्या यशकथा इतरांसाठीही प्रेरणादायी असतात. अशाच प्रकारे नीमचच्या वंशिकानेही स्वतःचं स्वप्न सत्यात उतरवलं आहे. वंशिका गुप्ता दिवाणी न्यायाधीश वर्ग-2 च्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन नीमच कोर्टात न्यायाधीश बनली आहे. तिचे वडील दिवाणी न्यायाधीशांच्या गाडीचे चालक आहेत. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने घेतलेल्या दिवाणी न्यायाधीश वर्ग-2 चा निकाल मंगळवारी लागला. यात दिवाणी न्यायाधीशांच्या ड्रायव्हरच्या मुलीने मिळवलेल्या या यशाचा संपूर्ण जिल्ह्याला अभिमान आहे. त्याचबरोबर वंशिकाच्या कुटुंबात आनंदाची लाट उसळली आहे. तिच्या वडिलांना (अरविंद गुप्ता) तर आकाश ठेंगणं झालंय. तिचे आजोबाही दिवाणी न्यायालयात कारकून होते. वंशिकाने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांची प्रेरणा, मेहनत आणि समर्पणाला दिलं आहे. राज्यभरातील न्यायालयांमधील रिक्त असलेल्या 252 जागांसाठी देशभरातील 350 उमेदवार लेखी परीक्षेला बसले होते. मंगळवारी सायंकाळी परीक्षेचा निकाल लागला. निकाल लागल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयात न्याय विभागातील तुटपुंज्या पगाराचे कर्मचारी अरविंद गुप्ता यांच्या आनंदाचं वातावरण आहे. त्यांची मुलगी वंशिता गुप्ता पहिल्याच प्रयत्नात दिवाणी न्यायाधीश झाली आहे. वंशिकाने संपूर्ण राज्यात सातवा क्रमांक पटकावला आहे. हे वाचा - जम्मू-काश्मीरचा राजकीय नकाशा बदलला..!, काश्मिरी पंडितांसाठी राखीव जागा आजोबा न्यायालयातले निवृत्त कारकून आहेत वंशिका गुप्ता यांचे आजोबा रमेशचंद गुप्ता हे देखील कोर्टात ग्रेड-1 रीडर होते. सेवानिवृत्तीनंतर सध्या ते मंदसौरमध्ये कायद्याची प्रॅक्टिस करत आहेत. त्याचवेळी वडील अरविंद गुप्ता हे सध्या जिल्हा न्यायालयात अल्प पगाराचे कर्मचारी (ड्रायव्हर) आहेत. त्याचबरोबर वंशिकाची आई शाळेत शिक्षिका आहे. त्यांनी सांगितलं की, वंशिका लहानपणापासून घरातील कोर्ट-कोर्टातील चर्चा ऐकत आली आहे. मी माझ्या वडिलांना कष्ट करताना पाहायचो तेव्हा त्यांना वाटायचं की आयुष्यात काहीतरी करायला हवं, असं वंशिका म्हणाली. हे वाचा - भारतात लवकरच लागू होणार 4 दिवसांचा आठवडा? कसं असेल स्वरूप? तज्ज्ञ म्हणतात… आईने सांगितलं की, लहानपणापासूनच तिला न्यायाधीश बनण्याची इच्छा होती. तिचे वडील तिला नेहमी सांगायचे की, ‘मुली तू असं काम केलं पाहिजेस, ज्यामुळे माझी ओळख अजून मोठी होईल.’ वंशिका गुप्ता यांनी ते सिद्ध केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.