जाहिरात
मराठी बातम्या / देश / जम्मू- काश्मीरमधील मतदारसंघांची फेररचना; काश्मिरी पंडितांसाठी राखीव जागा, विधानसभेत 90 जागा होणार

जम्मू- काश्मीरमधील मतदारसंघांची फेररचना; काश्मिरी पंडितांसाठी राखीव जागा, विधानसभेत 90 जागा होणार

जम्मू- काश्मीरमधील मतदारसंघांची फेररचना;  काश्मिरी पंडितांसाठी राखीव जागा, विधानसभेत 90 जागा होणार

सीमांकन आयोगाने (Demarcation Commission) जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) केंद्रशासित प्रदेशात विधानसभेच्या (Assembly seats) जागा वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

श्रीनगर, 06 मे: सीमांकन आयोगाने (Demarcation Commission) जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) केंद्रशासित प्रदेशात विधानसभेच्या (Assembly seats) जागा वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. सीमांकन आयोगाने जम्मू-काश्मीरसाठी एकूण 7 जागा वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाच्या अंमलबजावणीनंतर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या जागांची संख्या 83 वरून 90 पर्यंत वाढणार आहे. न्यायमूर्ती (आर) रंजना देसाई (Justice (R) Ranjana Desai) यांच्या अध्यक्षतेखालील जम्मू-काश्मीरवरील तीन सदस्यीय सीमांकन आयोगाने गुरुवारी या अहवालावर स्वाक्षरी केली. सीमांकन आयोगाचा कार्यकाळ शुक्रवारी म्हणजेच 6 मे रोजी संपत होता. याशिवाय आयोगाने काश्मिरी पंडितांसाठी विधानसभेत 2 जागा राखीव ठेवण्याचाही प्रस्ताव दिला आहे. आता या आदेशाची प्रत आणि अहवाल सरकारला पाठवण्यात येणार आहे. या अहवालात मतदारसंघांची संख्या, त्यांचे क्षेत्रफळ, आकारमान व लोकसंख्या इत्यादींचे तपशीलवार वर्णन आहे. त्यानंतर राजपत्र अधिसूचनेद्वारे या आदेशाची अंमलबजावणी केली जाईल. जम्मूच्या जागा वाढतील या आयोगाने जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या जागांची संख्या 83 वरून 90 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. याशिवाय पाकव्याप्त काश्मीर (PoK) साठी 24 जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. यापूर्वीही या जागा रिक्त ठेवण्यात आल्या होत्या. सीमांकन आयोगाच्या म्हणण्यानुसार, वाढलेल्या 7 जागांपैकी 6 जागा जम्मूमध्ये येतील, तर काश्मीरमध्ये 1 जागा वाढवण्यात येईल. सध्या जम्मू भागात विधानसभेच्या 37 जागा आहेत तर काश्मीरमध्ये विधानसभेच्या 46 जागा आहेत. या ठरावाच्या अंमलबजावणीनंतर, जम्मूमध्ये विधानसभेच्या जागांची संख्या (37+6) 43 होईल, तर काश्मीर विभागात (46+1) जागांची संख्या 47 होईल. ही सीमांकन लागू झाल्यानंतर जम्मूचे राजकीय महत्त्व वाढणार आहे. काश्मिरी पंडितांसाठी 2 जागा राखीव सीमांकन आयोगाच्या अहवालानुसार, काश्मिरी स्थलांतरितांसाठी 2 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सीमांकन आयोगाच्या अहवालात यासाठी काश्मिरी स्थलांतरित असा शब्द वापरण्यात आला आहे. या निर्णयामुळे काश्मिरी पंडितांचे (Kashmiri Migrants)) विधानसभेतील प्रतिनिधित्व वाढेल, असे मानले जात आहे. अनुसूचित जमातीसाठी 9 जागा राखीव जम्मू-काश्मीर सीमांकन आयोगामध्ये प्रथमच अनुसूचित जमातीसाठी 9 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यापैकी 6 जम्मू विभागात आहेत तर 3 काश्मीर विभागात आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी मार्च 2020 मध्ये सीमांकन आयोगाची स्थापना करण्यात आली होती. गेल्या वर्षी या आयोगाला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र आणि जम्मू आणि काश्मीरचे निवडणूक आयुक्त हे या पॅनेलचे पदसिद्ध सदस्य आहेत. फेब्रुवारीमध्ये या आयोगाला पुन्हा 2 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. Agriculture side business : गाय खरेदी करताना ‘या’ गोष्टींचे पालन करा नफ्यात रहाल   या अहवालाच्या प्रसिद्धीसोबतच जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सीमांकनाची अधिसूचना जारी झाल्याने लवकरच येथे विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात