मराठी बातम्या /बातम्या /करिअर /IMP News! भारतात लवकरच लागू होणार 4 दिवसांचा आठवडा? कसं असेल स्वरूप? तज्ज्ञ म्हणतात...

IMP News! भारतात लवकरच लागू होणार 4 दिवसांचा आठवडा? कसं असेल स्वरूप? तज्ज्ञ म्हणतात...

चार दिवसांचा आठवडा लागू होण्याची चिन्हं

चार दिवसांचा आठवडा लागू होण्याची चिन्हं

देशात नवीन लेबर कोड (What is New labor Code) हे फायनान्शिअल इयर 2022-23 (Financial Year 2022-23) मध्ये लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई, 06 मे: गेल्या कित्येक दिवसांपासून भारतातही चार दिवसांचा आठवडा (4 day week in India) होणार का? आणि असा चार दिवसांचा आठवडा झाल्यास कर्मचाऱ्यांच्या कामावर याचा नक्की कसा परिणाम (Benefits of 4 day week in India) होणार? याबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. त्यात आता देशात नवीन लेबर कोड (What is New labor Code) हे फायनान्शिअल इयर 2022-23 (Financial Year 2022-23) मध्ये लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे देशातही लवकरच चार दिवसांचा आठवडा लागू होण्याची चिन्हं आहेत.

बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! कोणतेही ग्रॅज्युएट असाल तरी करा अप्लाय; 195 जागा रिक्त

एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्ह्णणण्यानुसार, नवीन फोर लेबर कोड (New labor code in FY 2022-23) 2022-23 च्या पुढील आर्थिक वर्षात लागू होण्याची शक्यता आहे कारण मोठ्या संख्येनं राज्यांनी यावरील मसुदा नियमांना अंतिम रूप दिलं आहे. केंद्रानं फेब्रुवारी 2021 मध्ये या संहितांवरील मसुदा नियमांना अंतिम रूप देण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. परंतु कामगार हा समवर्ती विषय असल्यानं, केंद्रानं आणि राज्यांनीही ते एकाच वेळी लागू करावेत असं सांगण्यात आलं आहे.

त्यामुळे येत्या फायनान्शिअल इयरमध्ये न्हणजेच 2022-23 मध्ये भारतात चार दिवस दिवसांचा आठवडा (4 day week policy in India) सुरु होण्याची शक्यता आहे. तसंच नवीन लेबर कोडही लागू होण्याची शक्यता आहे. या नवीन संहिता अंतर्गत, रोजगार आणि कार्य संस्कृतीशी संबंधित कर्मचार्‍यांचे घरून पगार (Salary of Employees in 4 day week), कामाचे तास आणि आठवड्याच्या दिवसांची संख्या यासह अनेक पैलू, सर्वसाधारणपणे, बदलू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Career Tips: ऑफिसमध्ये 'या' ट्रिक्स वापरून Boss होईल खुश; तुम्हालाही मिळेल Promotion; वाचा सविस्तर

नवीन कायदे कर्मचार्‍यांच्या मूळ वेतन आणि PF ची गणना करण्याच्या पद्धतीमध्ये मोठा बदल घडवून आणतील. या नवीन नियमांनुसार कर्मचाऱ्यांचे पीएफ खात्यात दरमहा योगदान वाढेल परंतु मासिक वेतन (Salary in 4 day week) कमी होईल. नियम भत्ते 50 टक्क्यांपर्यंत मर्यादित होतील, ज्याचा अर्थ असा होतो की पगाराचा अर्धा भाग मूळ वेतन असेल आणि भविष्य निर्वाह निधीमधील योगदान हे मूळ वेतन आणि महागाई भत्ता यांचा समावेश असलेल्या मूळ वेतनाच्या टक्केवारीच्या रूपात असेल.

First published:

Tags: Career, India, Job, Workload