जाहिरात
मराठी बातम्या / देश / नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अमित शहा कसे झाले पॉवरफुल? ही आहे Inside स्टोरी

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अमित शहा कसे झाले पॉवरफुल? ही आहे Inside स्टोरी

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अमित शहा कसे झाले पॉवरफुल? ही आहे Inside स्टोरी

NDA government oath ceremony : अमित शहा कसे झाले पॉवरफुल?

  • -MIN READ
  • Last Updated :

    नवी दिल्ली,31 मे : नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांना पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी 57 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा देखील पार पडला. आपल्या मंत्रिमंडळामध्ये नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांना देखील स्थान दिलं. सर्व गणितं पाहता अमित शहा यांना नंबर दोनचं मंत्रिपद दिलं जाऊ शकतं अशी देखील चर्चा आहे. 1980च्या दशकात अमित शहा नरेंद्र मोदी यांच्या जवळचे म्हणून समोर आले. दोघांनी गुजरातमधून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात केली. 2014 किंवा 2019मध्ये अमित शहा यांनी प्रचारात महत्त्वाची भूमिका पार पाडली. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना देखील शहा यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. देशातील सर्वात गरीब खासदार; ओडिशाच्या मोदींबद्दल तुम्हाला माहित आहे? असा दिला पहिला संकेत राज्यसभा सोडून लोकसभा निवडणूक लढवण्याचे अमित शहा यांनी संकेत दिले. त्यावेळी अमित शहा यांच्यावर मोठी जबाबदारी भविष्यात दिली जाऊ शकते अशी चर्चा रंगली. गांधीनगरमधून अमित शहा यांनी मोठा विजय मिळवला. मोदी - शहा आले एकत्र निकालानंतर नरेंद्र मोदी आणि अमित शहा एकत्र आले. त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना अभिवादन केलं. शिवाय, गांधीनगर आणि वाराणसीमध्ये दोन्ही नेत्यांनी एकत्र रोड शो केले. मंत्रिमंडळ बनवण्यामध्ये देखील अमित शहा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मोदींनी शपथ घेतली आणि या देशात झाला जल्लोष; Video Viral नरेंद्र मोदींनी केलं कौतुक 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अमित शहा यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली होती. 2014च्या विजयानंतर नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांची ‘मॅच ऑफ द मॅन’ अशा शब्दात स्तुती केली होती. शिवाय, आपण त्यांना अनेक वर्षापासून वैयक्तिकरित्या ओळखत असल्याचं म्हणत त्यांचं कौतुक देखील केलं होतं. EXCLUSIVE VIDEO : शपथविधीनंतर अरविंद सावंत यांची पहिली प्रतिक्रिया

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात