देशातील सर्वात गरीब खासदार; ओडिशाच्या मोदींबद्दल तुम्हाला माहीत आहे?
सोशल मीडियावर सध्या ओडिशाच्या प्रतापचंद्र सारंगी यांची चर्चा जोरात सुरू आहे. त्यांना ओडिशाचे मोदी म्हणून देखील ओळखले जाते.
|
1/ 6
ओडिशातील बालशोर लोकसभा मतदारसंघातून प्रचापचंद्र सारंगी भाजपच्या तिकीटावर विजयी झाले. त्यांनी बीजेडीच्या रविंद्र कुमार जेना यांना 12,956 मतांनी हरवलं. 2014मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पण, 2019मध्ये मात्र त्यांनी विजय मिळवला.
2/ 6
सोशल मीडियावर प्रचापचंद्र सारंगी यांच्याबद्दल जोरदार चर्चा आहे. त्यांना ओडिशाचे मोदी म्हणून देखील ओळखले जाते. त्यांनी लग्न देखील केलेलं नाही. आज देखील ते झोपडीत राहतात. त्यांची आर्थिक स्थिती कमजोर आहे.
3/ 6
प्रतापचंद्र सारंगी यांचा जन्म बालसोर येथील गोपीनथपूर येथील गरिब कुटुंबात झाला. लहानपणापासून अध्यात्मिक असलेले सारंगी यांनी पदवीपर्यंतच शिक्षण घेतलं आहे.
4/ 6
प्रतापचंद्र सारंगी यांनी साधु बनायचं होतं. त्यासाठी ते रामकृष्ण मठात गेले. पण, मठातील लोकांना सारंगी यांचे वडील नाहीत याची माहिती कळली. त्यानंतर त्यांनी सारंगी यांना आईची सेवा करण्याचा सल्ला दिला.
5/ 6
सारंगी हे सायकलवरून प्रवास करतात. त्यांनी बालासोर आणि मयूरभंज जिल्ह्यातील आदिवासी भागात शाळा बांधल्या आहेत.
6/ 6
नरेंद्र मोदी यांच्या जवळचे म्हणून प्रतापचंद्र सारंगी यांची ओळख आहे. नरेंद्र मोदी ओडिशाला गेल्यानंतर सारंगी यांची भेट घेतात.