मोदींनी शपथ घेतली आणि या देशात झाला जल्लोष; Video Viral

मोदींनी शपथ घेतली आणि या देशात झाला जल्लोष; Video Viral

आयकॉनिक टॉवरवर दोन्ही देशाचे राष्ट्रध्वज आणि त्यांच्या राष्ट्रप्रमुखांचे फोटो झळकले.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 मे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर संपूर्ण देशात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. पण हा जल्लोष केवळ भारतातच नाही तर अन्य देशात देखील पहायला मिळाला. संयुक्त अरब अमीरातची राजदानी अबु धाबीमधील आयकॉनिक अ‍ॅडनॉन ग्रुप टॉवरवर भारत आणि अबु धाबीचे राष्टध्वज झळकले. टॉवरवर अबू धाबबीचे राजकुमार पीएम शेख मोहम्मद बिन जायद यांच्या सोबत पंतप्रधान मोदींचा फोटो देखील झळकला.

आयकॉनिक टॉवरवर दोन्ही देशाचे राष्ट्रध्वज आणि त्यांच्या राष्ट्रप्रमुखांचे फोटो झळकले. या टॉवरवरील फोटोचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मोदी 2.0 चा जल्लोष अबु धाबीत देखील दिसला. याच पद्धतीने दुबईतील बुर्ज खलीफावर देखील भारतीय राष्ट्रध्वज झळकला. या घटनेचा व्हिडिओ युएईमधील भारतीय राजदूत नवदीप सूरी यांनी ट्विटवर शेअर केला. ज्या पद्धतीने अबू धाबीत भारतातील नव्या सरकारचा जल्लोष साजरा केला त्यावरून लक्षात येते की दोन्ही देशांमध्ये किती मैत्री आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमरा यांनी या घटनेवर म्हटले आहे की, ही एक असाधारण घटना आहे, युएई सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाच्या शपधविथी सोहळ्याच्या निमित्ताने ADNOC भवन निर्मिती केली.

हे देखील वाचा: मोदी मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक, मंत्रालयाचे होणार वाटप!

शरद पवार काँग्रेसचे नवे अध्यक्ष? राहुल गांधींसोबतच्या भेटीचा EXCLUSIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 31, 2019 07:37 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading