जाहिरात
मराठी बातम्या / देश / मदन शर्मा मारहाण प्रकरणी नवनीत राणा पोहोचल्या थेट संरक्षण मंत्र्यांकडे, उद्धव ठाकरेंवर केला गंभीर आरोप

मदन शर्मा मारहाण प्रकरणी नवनीत राणा पोहोचल्या थेट संरक्षण मंत्र्यांकडे, उद्धव ठाकरेंवर केला गंभीर आरोप

मदन शर्मा मारहाण प्रकरणी नवनीत राणा पोहोचल्या थेट संरक्षण मंत्र्यांकडे, उद्धव ठाकरेंवर केला गंभीर आरोप

शिवसैनिकांनी माजी सैन्य अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केली होती. या प्रकरणात आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही उडी घेतली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 14 सप्टेंबर :  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्टून  काढल्या प्रकरणी शिवसैनिकांनी माजी सैन्य अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केली होती. या प्रकरणात आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही उडी घेतली आहे. मदन शर्मा यांना मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई करावी म्हणून आज देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. …अन् पत्नीनं स्वत: काढून दिलं गळ्यातलं मंगळसूत्र, उपासमारीचं भीषण वास्तव तसंच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मदन शर्मा यांना मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांचे समर्थन केले आहे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका तासात या सगळ्या मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांची जामीन दिला आहे. यावरून मुख्यमंत्र्यांचं सुद्धा या मारेकऱ्यांना समर्थन आहे, असा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी  नवनीत राणा यांनी केली आहे. विशेष म्हणजे, काही दोनच दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी कंगना राणावत प्रकरणावरून शिवसेनेवर टीका केली होती. ‘राज्य सरकारने कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड केली. सत्तेत असल्यामुळे दुरुपयोग करून ही कारवाई करण्यात आली आहे. ही हुकूमशाही योग्य नाही, अशी टीका नवनीत राणा यांनी केली होती. एका व्यक्तीच्या अहंकारामुळे देशभरात कोरोनाचा उद्रेक, राहुल गांधींची जळजळीत टीका त्यानंतर नवनीत राणा यांनी आपला मोर्चा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडे वळवला. ‘महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती हा राज्याची जबाबदारी घेऊन चालतो. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांची एकतर पाठराखण करावी किंवा महिलांच्या बाजूने असाल तर त्यांचा राजीनामा घ्या’, अशी मागणीच नवनीत राणा यांनी केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP , rana , samana
  • First Published :
जाहिरात
जाहिरात