मराठी बातम्या /बातम्या /देश /

खोटे जात प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून निर्णयाला स्थगिती

खोटे जात प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून निर्णयाला स्थगिती

नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र हे खोटे असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळ यांनी केला होता.

नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र हे खोटे असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळ यांनी केला होता.

नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र हे खोटे असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळ यांनी केला होता.

नवी दिल्ली, 22 जून: खोटे जात प्रमाणपत्र प्रकरणी अमरावतीच्या (Amravati) खासदार नवनीत राणा (Navneet Rana caste certificate canceled) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाच्या (Mumbai high court) निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसंच, तक्रारदारांना नोटीसही बजावण्यात आली आहे. नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र हे खोटे असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळ यांनी केला होता. त्यामुळे मुंबई हायकोर्टाने (High Court Mumbai) हे प्रमाणपत्र रद्द केले होते. या निर्णयाविरोधात नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ‘वर्क फ्रॉम होम’ला कंटाळलात; मुलांबरोबर क्वालिटी टाइम कसा घालवाल? सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांना दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. उच्च न्यायालयाने राणांचे जात प्रमाणपत्र रद्द केले होते. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेवरुन राणा खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. आज सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती दिली आणि सर्व तक्रारदारांना नोटीस बजावून उत्तर मागितलं आहे. पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर होणार आहे. काय आहे प्रकरण? नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र खोटं असल्याबाबत शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळ (Anandrao Adsul) यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. सदर दाव्याचा निकाल 8 जून रोजी घोषीत करण्यात आला होता. उच्च न्यायालयाने ही घटना घोटाळा आहे, असे मत नोंदवून सदर जात प्रमाणपत्र रद्द करुन नवनीत राणा यांना 2 लाखाचा दंड ठोठावला होता. तसंच सदरचं खोटं जात प्रमाणपत्र 6 आठवड्याच्या आत शासनाला जमा करण्याचे आदेश दिले होते. जातप्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे नवनीत राणा यांना मोठा धक्का बसला होता, त्यामुळे नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली होती. पण, अखेर सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.
First published:

Tags: High Court, Suprim court

पुढील बातम्या