• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • ‘वर्क फ्रॉम होम’ला कंटाळलात; मुलांबरोबर क्वालिटी टाइम कसा घालवाल?

‘वर्क फ्रॉम होम’ला कंटाळलात; मुलांबरोबर क्वालिटी टाइम कसा घालवाल?

मुलांबरोबर क्वालिटी टाईम घालवा.

मुलांबरोबर क्वालिटी टाईम घालवा.

Work from Home चे तोटेच अधिक असल्याचं आता लक्षात येतंय. घरी असूनही पालकांना मुलांबरोबर चांगला वेळ घालवता येत नाही. मुलांबरोबर क्वालिटी टाईम घालवायचा असेल तर, या टिप्स फॉलो करा.

 • Share this:
  नवी दिल्ली, 22 जून: कोरोना काळात (Corona Period) बऱ्याच कंपन्यानी त्यांच्या कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होमची (Work from Home)सुविधा दिलेली आहे. मात्र याच्या फायद्यांपेक्षा तोटेच सहन करावे लागत आहेत. घरी असूनही लोक रात्रंदिवस काम (Day Night Work)करतात. त्यामुळे त्यांचं कौटुंबिक जीवन (Family Life)खूप डिस्टर्ब झालं आहे. कामाच्या दबावामुळे आपल्यात आणि मुलांमध्ये अंतर निर्माण झालं असेल तर, काही खास टिप्स जाणून घ्या. त्यामुळे वर्क फ्रॉम होम मध्येही चांगले पालक म्हणून सिद्ध होऊ शकता आणि व्यावसायिक-वैयक्तिक जीवनात एक लाईन तयार करू शकता. जाणून घेऊया त्या टिप्स. खेळ कामासाठी वेगळी जागा कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी शांतता आवश्यक असते. पण, घरात मुलं खेळत असतील तर, कामात लक्ष लागत नाही आणि मुलही  चांगल्या प्रकारे खेळू शकत नाहीत. त्यामुळे खेळण्याची आणि कामाची जागा निश्चित करा. जर, जागा ठरवल्याने ट्रेसशिवाय काम करू शकता आणि मुलंही बिनधास्त खेळतील. (डायबेटिसच्या रुग्णांची दूध प्यायल्याने साखर वाढते? घाबरू नका; वाचा नवीन संशोधन) फ्री टाईममध्ये ऑफिसच्या लॅप टॉपपासून दूर रहा जेव्हा आठवड्याची सुट्टी मिळेल किंवा कामाची वेळ संपेल तेव्हा लॅपटॉपवर चिकटू बसू नका. यावेळी आपल्या लहान मुलांबरोबर वेळ घालवा. उत्साहाने त्यांच्याबरोबर कौटुंबिक जीवनाचा आनंद घ्या. आठवडाभर मुलांना वेळ न दिल्याने मुलं ते देखील वाट पहात असतात. (उर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का? जाणून घ्यायच आहे वाचा) मुलांबरोबर शिका ही ट्रिक खरच फायदेशीर आहे. आपल्या मुलांना काही हॅक्स शिकवा. त्यामुळे मुलांचा आणि तुमचा वेळ मजेत जाईल. याशिवाय नवीन भाषा किंवा ऑनलाईन कोणतीही डीआयवाय शिकू शकता. त्यामुळे कुटूंबाबरोबर क्वालिटी टाईम घालवता येईल. (नेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स) मुलांसोबत जेवण बनवा हल्ली मुलांना स्वयंपाक करायची आवड लागली आहे. मुलांना जेवण बनवायचं असेल एखादी डिश करायची असेल तर, त्यांना त्यात मदत करा किंवा त्यांची मदत घ्या. ऑम्लेट बनवत असाल तर, त्यांना फ्रिज मधून अंडी काढायला सांगा. या छोट्या ट्रिक्सही उपयोगी पडतील.
  Published by:News18 Desk
  First published: