नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : आज देशभरात राष्ट्रीय संविधान दिवस (National Constitution Day) साजरा केला जात आहे. मात्र आजच्या दिवशी संविधान दिवस साजरा का केला जातो? या तुमच्या प्रश्नाचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. भारतीय घटनेत नमूद केलेले कायदे, हक्क आणि अधिकार आणि तत्त्वांचं पालन भारतीय नागरिक करतात ती राज्यघटना सर्व प्रथम 26 नोव्हेंबर 1949 रोजी संसदेनं स्वीकारली. हा दिवस साजरा करण्यासाठी 26 नोव्हेंबर हा राष्ट्रीय राज्यघटना दिवस किंवा संविधान दिवस म्हणून पाळला जातो.
या घटनेत मूलभूत राजकीय संहिता, रचना, कार्यपद्धती, अधिकार, सरकारी संस्थांची कर्तव्य, मूलभूत हक्क आणि नागरिकांची कर्तव्यं नमूद केलेली आहेत. कोणत्याही महत्त्वाच्या प्रसंगी शपथ घेण्यासाठी सरकार आणि नागरिकांसाठी भारतीय राज्यघटना हा महत्त्वाचा दस्तावेज मानला जातो.
वाचा-BREAKING: 31 डिसेंबरपर्यंत उड्डाण घेणार नाहीत आंतरराष्ट्रीय विमानं, DGCAचे आदेश
पृथ्वीवरील लिखित स्वरूपातील सर्वांत मोठी राज्यघटना असा या घटनेचा गौरव केला जातो. भारतीय राज्य घटनेला एक सुंदर कलाकृतीच समजलं जातं आणि ही कलाकृती घडवणाऱ्या संविधान समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या राज्यघटनेचे शिल्पकार मानले जातात.
वाचा-हिवाळ्यातही मुसळधार पाऊस आणि वादळ! 'निवार'चं भीषण रूप दाखवणारे PHOTOS
26 नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो?
भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 ला लागू झाली त्यामुळे तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. मात्र 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय संसदेने संविधानाचा स्वीकार केला त्यामुळे तो दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो. हे संविधान लागू झाल्याने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अक्ट 1935 हा कायदा संपुष्टात आला. भारतीय संविधान दिन म्हणून 26 नोव्हेंबर साजरा करण्याचा निर्णय सन 2015 मध्ये अंमलात आणला गेला. केंद्र सरकारने नागरिकांमध्ये संविधानाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी 26 नोव्हेंबरला संविधान दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता त्यानुसार सामाजिक न्याय मंत्रालयाने आदेश काढला होता.
वाचा-26/11 Terror: 'आम्ही हे विसरणार नाही', जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानचा निषेध
संविधान दिनाचे महत्त्व
भारतीय संविधानाने निश्चित केलेल्या यंत्रणा आणि प्रशासनाची पद्धत यावर भारतीय नागरिकांचा असलेला विश्वास हा दिवस साजरा केल्याने दृढ होतो. राज्यघटनेत नमूद केलेल्या देशाच्या लोकशाही, प्रजासत्ताक, समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता या तत्त्वांची आठवण हा दिवस आपल्याला करून देतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.