जाहिरात
मराठी बातम्या / देश / BREAKING: 31 डिसेंबरपर्यंत उड्डाण घेणार नाहीत आंतरराष्ट्रीय विमानं, DGCA चे आदेश जारी

BREAKING: 31 डिसेंबरपर्यंत उड्डाण घेणार नाहीत आंतरराष्ट्रीय विमानं, DGCA चे आदेश जारी

BREAKING: 31 डिसेंबरपर्यंत उड्डाण घेणार नाहीत आंतरराष्ट्रीय विमानं, DGCA चे आदेश जारी

International Flights Ban Till 31st December: 31 डिसेंबरपर्यंत देशातील कोणतेही व्यावसायिक आंतरराष्ट्रीय विमान भारताबाहेर जाणार नाही किंवा दुसर्‍या देशातूनही भारतात येणारही नाही. या दरम्यान वंदे भारत मिशन विशेष विमानसेवा मात्र सुरू राहणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर: देशभरात कोरोना व्हायरसचे (Coronavirus) वाढते संक्रमण लक्षात घेता डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) ने भारतातील कमर्शिअल आंतरराष्ट्रीय विमानसेवा (International Flights) बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. आता ही सेवा बंद राहण्याची तारीख 31 डिसेंबर 2020 पर्यंत (International Flights Ban Till 31st December 2020) वाढवण्यात आली आहे. अर्थात 31 डिसेंबरपर्यंत देशातील कोणतेही व्यावसायिक आंतरराष्ट्रीय विमान भारताबाहेर जाणार नाही किंवा दुसर्‍या देशातूनही भारतात येणारही नाही. दरम्यान या कालावधीमध्ये वंदे भारत मिशनअंतर्गत (Vande Bharat Mission) उड्डाण भरणारी विमानं सुरू राहणार आहेत. याआधी DGCA ने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याचे आदेश दिले होते. यावर्षी 23 मार्चपासून व्यावसायिक आंतरराष्ट्रीय उड्डाणं बंद केले आहेत. त्यावेळी देशांतर्गत विमानसेवा देखील बंद करण्यात आली होती. मात्र 25 मे पासून देशांतर्गत उड्डाणे पुन्हा सुरू करण्यात आली.

जाहिरात

‘वंदे भारत मिशन’ मधून 20 लाखांपेक्षा जास्त भारतीय देशात परतले मे महिन्यापासून ‘वंदे भारत मिशन’अंतर्गत आणि जुलै महिन्यापासून ‘द्विपक्षीय एअर बबल’ करारांअंतर्गत काही देशातील विशेष आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. भारताने जवळपास 18 देशांबरोबर ‘एअर बबल’ (Air Bubble) करार केला आहे. देशांतर्गत विमानसेवा दोन महिन्यांपासून बंद राहिल्यानंतर 25 मे 2020 पासून पुन्हा एकदा सुरू करण्यात आली होती. (हे वाचा- बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, आज संपामुळे कामकाज विस्कळीत होण्याची शक्यता ) 7 मे पासून वंदे भारत मिशन सुरू झाल्यानंतर 29 ऑक्टोबरपर्यंत 20 लाखांहून जास्त भारतीयांना दुसऱ्या देशातून परत आणण्यात यश मिळालं आहे.  1 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या मिशनच्या सातव्या टप्प्यात या महिन्याच्या अखेरीस 24 देशांकडून 1057 आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे संचालन केले गेल.या अंतर्गत 1.95 लाख लोक आल्याचा अंदाज आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात