बंगालच्या उपसागरातून आलेल्या भयंकर निवार चक्रीवादळानं (Cyclone Nivar ) तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये हाहाकार माजला. दरम्यान, हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 11.30 ते दुपारी 2.30 दरम्यान वादळ किनारपट्टीवर आदळले. यापूर्वी हवामान खात्याने सांगितले होते की यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 120 ते 130 किमी असू शकतो. (फोटो: AP)
असा विश्वास आहे की या चक्रीवादळामुळे पुद्दुचेरीमध्ये दरडही कोसळण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, तामिळनाडू राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तिरुवन्नमलाई, कुडलोर, कल्लाकुरीची आणि विल्लुपुरममध्ये मुसळधार पावसासाठी अलर्ट जारी केला आहे. त्याशिवाय चेंगलपट्टूसह 19 जिल्ह्यात मध्यम ते जोरदार वादळासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (फोटो: AP)
या वादळामुळे बरीच झाडं पडली, अनेक भिंती पडल्या, पण एक चांगली बातमी अशी आहे की आतापर्यंत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. हवामान खात्याने ही माहिती दिली. पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनीही सांगितले की, केंद्रशासित प्रदेशात अद्याप कोणाचाही मृत्यू झालेली नाही. त्याचवेळी सुमारे दोन हजार लोकांना मदत शिबिरात हलविण्यात आले आहे. (फोटो: AP)
पुद्दुचेरीचे सीएम नारायणस्वामी यांनी पिकं, लोकांची घरं आणि जुन्या इमारतींचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली आहे. पुद्दुचेरीमध्ये कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. तर दुधाची दुकाने, पेट्रोल पंप, रुग्णालये, औषधांची दुकाने व शासकीय कार्यालये वगळता सर्व अनावश्यक ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. (फोटो: AP)