जाहिरात
मराठी बातम्या / देश / 26/11 Terror Attack: 'तुम्ही अजिबात दया दाखवली नाही... आम्ही हे विसरणार नाही', जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानचा निषेध

26/11 Terror Attack: 'तुम्ही अजिबात दया दाखवली नाही... आम्ही हे विसरणार नाही', जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानचा निषेध

26/11 Terror Attack: 'तुम्ही अजिबात दया दाखवली नाही... आम्ही हे विसरणार नाही', जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानचा निषेध

मुंबईवर झालेल्या भ्याड हल्ल्याला 12 वर्ष पूर्ण, जम्मू-काश्मीरमध्ये झळकले पाकिस्तानच्या निषेधाचे पोस्टर्स.

  • -MIN READ
  • Last Updated :

श्रीनगर, 26 नोव्हेंबर : मुंबईवर 2008 साली 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 12 वर्षे पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी पाकिस्तानमधून समुद्रामार्गे आलेल्या दहशतवाद्यांच्या पथकाने मुंबईत एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे 168 लोक ठार झाले. बईमधील दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या लोकांच्या आठवणींना उजाळा देण्याच्या निमित्तानं जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानविरोधात अनेक ठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. गुपाकर, राजबाग, टीआरसी, बारामालू आणि हैदरपुरा या भागात ही पोस्टर्स लावण्यात आली आहेत. एका पोस्टरमध्ये पाकिस्ताननं केलेल्या भ्याड हल्ल्याचा उल्लेख करत आम्ही पाकिस्तानी लोकांनी जे केले ते कधीच विसरणार नाही. हल्ल्याबाबत पोस्टरवर, या दहशतवाद्यांनी कोणतीही दया दाखवली नाही, या अतिरेक्यांनी आम्हाला तोडण्याचा प्रयत्न केला. शेवटी असे लिहिले आहे की पाकिस्तान आणि त्याच्या पुरस्कृत दहशतवाद्यांनी 26 नोव्हेंबर रोजी दहशत निर्माण केली. दहशतवादाविरूद्ध आपण सर्वजण एकत्र आहोत.

News18

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईतील ताज हॉटेलसहीत सहा ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये 160 जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक मृत्यू हे छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे झालेल्या हल्ल्यात झाले. तर ताजमध्ये दहशतवाद्यांनी 31 जणांचे प्राण घेतले. जवळजवळ 60 तास दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक सुरु होती. या हल्ल्यातील मुख्य दहशतवादी अजमल कसाबला पोलिसांनी जिवंत पकडले. त्यानंतर त्याला फाशी देण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात