निवडणूक आयोगाची महत्त्वपूर्ण बैठक, 'या' 3 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा होणार जाहीर?

निवडणूक आयोगाची महत्त्वपूर्ण बैठक, 'या' 3 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा होणार जाहीर?

भारतीय निवडणूक आयोगाकडून तीन राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा आज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली,12 सप्टेंबर : भारतीय निवडणूक आयोगाकडून तीन राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा आज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक आयोगाच्या आज होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीत महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली जाऊ शकते. या तिन्ही राज्यांमध्ये 2019 अखेरीसपर्यंत निवडणुका होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र आणि हरियाणातील निवडणुका झारखंड आधी घेतल्या जातील. निवडणुकीसाठी कमी कालावधी पाहता दोन्ही राज्यांसाठी अधिसूचना जारी केली जाईल.

(वाचा :खळबळजनक : निवडणुकीच्या आधी पुणे जिल्ह्यात शस्त्रसाठा जप्त)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांवर निवडणुका होणार आहेत. तर हरियाणात 90 आणि झारखंडमध्ये 82 जागांवर निवडणुका होतील. या तिन्ही राज्यांमध्ये ऑक्टोबर 2014मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. आता या तिन्ही राज्यांतील विधानसभेचा कार्यकाळ लवकरच समाप्त होणार आहे. या पार्श्वभूमीवर तिन्ही राज्यांमध्ये यापूर्वी निवडणुकीचा कार्यक्रम संपन्न होणं आवश्यक आहे.

Poll dates, Haryana assembly elections, Jharkhand assembly elections, assembly elections,maharastra assembly elections,assembly elections 2019, assembly elections dates

(वाचा : नवी मुंबईच्या 'राष्ट्रवादी'च्या गडावर भाजपचा झेंडा, गणेश नाईकांच्या हातात 'कमळ')

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीपूर्वीच महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. 2014मध्ये दोन्ही राज्यांमध्ये निवडणुकांच्या तारखांची घोषणा 20 सप्टेंबर रोजी झाली होती आणि 15 ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले होते. तर 19 ऑक्टोबर रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले होते.

(वाचा :लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतं 'वंचित'ला मिळालीच नाहीत - प्रकाश आंबेडकर)

तिन्ही राज्यांमध्ये आलं होतं भाजप सरकार

2014मध्ये या तिन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीनं आपली सत्ता स्थापन केली होती. महाराष्ट्रात 288 जागांपैकी भाजपनं 122 जागा जिंकल्या होत्या आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले होते. तर हरियाणामध्ये 90 जागांपैकी भाजपला 47 जागांवर विजय मिळवला होता आणि मनोहर लाल खट्टर यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतली होती. झारखंडमध्ये भाजपनं भाजपनं 77 पैकी 35 जागा जिंकत रघुबर दास यांना राज्याचा मुख्यमंत्री बनवलं होतं.

SPECIAL REPORT : 'समस्या दूर करा नाहीतर मुख्यमंत्र्यांचं श्राद्ध घालू'

First published: September 12, 2019, 7:07 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading