खळबळजनक : निवडणुकीच्या आधी पुणे जिल्ह्यात शस्त्रसाठा जप्त

पोलिसांच्या गाडीची चाहूल लागताच आरोपीने पळ काढला. त्यानंतर मंचर पोलिसांनी अर्धा किलोमीटर पाठलाग करून त्याला पकडलं.

News18 Lokmat | Updated On: Sep 11, 2019 09:15 PM IST

खळबळजनक : निवडणुकीच्या आधी पुणे जिल्ह्यात शस्त्रसाठा जप्त

रायचंद शिंदे, आंबेगाव 11 सप्टेंबर : राज्यातल्या विधानसभा निवडणुकांना आता फक्त दोन महिने राहिले आहेत. त्या आधी पोलिसांनी पुणे जिल्ह्यात शस्त्रसाठा जप्त केल्याने खळबळ उडालीय. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात रांजणी गावच्या हद्दीत पेट्रोलिंग करताना मंचर पोलिसांनी एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे असा एकूण 15 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी धनंजय गंगाराम वाघ (वय 45)या आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय. रांजणी गावच्या हद्दीत पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे पोलीस नाईक नवनाथ नाईकडे पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी चितारे खाजगी वाहनाने  पेट्रोलिंग करत असताना ही शस्त्रास्त्र सापडली. रांजणी गावच्या हद्दीत कारमळा येथे कार फाटा ते नागापूर रस्त्यावर पहाटे चार च्या सुमारास एक इसम संशयितरित्या फिरताना आढळला.

वाचा : लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतं 'वंचित'ला मिळालीच नाहीत - प्रकाश आंबेडकर

त्याला पोलिसांच्या गाडीची चाहूल लागताच त्याने पळ काढला. त्यानंतर मंचर पोलिसांनी अर्धा किलोमीटर पाठलाग करून त्याला पकडलं. त्याची विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरचा संशय वाढला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसं असा 15 हजार 529 चा मुद्देमाल आढळून आला.

वाचा : अजित पवारांचा पलटवार, किंमत मोजावी लागली तरी चालेल पण दिलेला शब्द पाळतो!

आरोपीविरुद्ध मंचर पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी चोरी आणि जबरी चोरी सारखे गुन्हे दाखल आहेत. हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. या प्रकरणाचा मंचर पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अर्जुन शिंदे पोलीस हवालदार चंद्रकांत डुंबरे, नवनाथ नाईकडे योगेश रोडे शिवाजी चितारे सोमनाथ वाफगावकर प्रशांत भुजबळ तपास करत असून आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचं पोलिस निरीक्षक खराडे यांनी सांगितले.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2019 09:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...