Home /News /videsh /

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात पुढे, जगभरातील दिग्गज नेते पाठीमागे, एक फोटो ज्याने देशाचं लक्ष वेधलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात पुढे, जगभरातील दिग्गज नेते पाठीमागे, एक फोटो ज्याने देशाचं लक्ष वेधलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोत जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा (Fumio Kishida), त्यांच्या मागे अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन (Joe biden) आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीस (Anthony Albanese) दिसत आहेत.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 24 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या जपान दौऱ्यावर (PM Modi Japan Visit) आहेत. तिथे होत असलेल्या क्वाड देशांच्या बैठकीला ते उपस्थित आहेत. अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत या चार देशांचा (QUAD countries) हा ग्रुप आहे. क्वाडची ही दुसरीच प्रत्यक्ष बैठक (Quad in-person meeting) होत आहे. या सत्रामध्ये चार देशांच्या प्रमुखांमध्ये बऱ्याच महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होत आहेत. दरम्यान, या सर्व देशांच्या प्रमुखांचा एक फोटो (PM Modi at QUAD meet) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. काय खास आहे या फोटोमध्ये, ते जाणून घेऊया. या फोटोमध्ये सर्व देशांचे प्रमुख पायऱ्या उतरत खाली (QUAD meet viral photo) येत आहेत असं दिसतंय. यात सर्वात पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi viral photo), त्यांच्यासोबत जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा (Fumio Kishida), त्यांच्या मागे अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन (Joe biden) आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीस (Anthony Albanese) येत आहेत. यासोबतच मोदींच्या मागे बऱ्याच देशांचे विविध पदाधिकारीही आहेत. सर्वात पुढे पंतप्रधान मोदी ताठ मानेने चालत असल्याचं या फोटोत (PM Modi at QUAD) दिसतंय. त्यामुळे मोदींना ‘ग्लोबल लीडर’ (PM Modi Global Leader) असं संबोधून हा फोटो व्हायरल होत आहे. (महाविकास आघाडीची 'वर्षा'वर बैठक, 'सह्याद्री'वर नेत्यांची वर्दळ, मुंबईत राजकीय घडामोडींना प्रचंड वेग) भाजप पदाधिकाऱ्यांनी केलं ट्विट भाजपचे अमित मालवीय यांनी ट्विटरवर हा फोटो शेअर केला आहे. ‘लीडिंग दि वर्ल्ड.. ए पिक्चर इज वर्थ ए थाउजंड वर्ड्स’ (PM Modi Leading the world) अशा कॅप्शनसह त्यांनी हा फोटो ट्विट केला. त्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा (Sambit Patra tweet) यांनीदेखील ‘विश्व गुरू भारत’ अशी कॅप्शन देऊन हा फोटो ट्विट केला. स्मृती इराणी यांनी ‘प्रधान सेवक – नोज दी वे, गोज दी वे, शोज दी वे’ अशा कॅप्शनसह हा पंतप्रधानांचा फोटो ट्विट केला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींना ‘ग्लोबल लीडर’ म्हटलं आहे. पंतप्रधान पहिल्यापासूनच ग्लोबल लीडर दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ग्लोबल लीडर (PM Modi Global Leader rating) आहेत यावर शिक्कामोर्तब झालं होतं. मॉर्निंग कन्सल्ट या अमेरिकेच्या डेटा इंटेलिजन्स फर्मने केलेल्या सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंग मिळालं होतं. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदींना यात 71 टक्के मतं मिळाली होती. तर अमेरिकेचे राष्ट्रपती बायडेन यांना केवळ 43 टक्के मतांवर समाधान मानावं लागलं होतं. एकंदरीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ग्लोबल लीडर असून, ते जगातल्या बलाढ्य अशा देशांच्या नेत्यांमध्ये ते आघाडीवर आहेत, हेच सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमधून दिसून येतंय.
    First published:

    पुढील बातम्या