Home /News /news /

अशोक चव्हाण ठाकरे सरकारमध्ये नाराज? बाळासाहेब थोरात म्हणाले...

अशोक चव्हाण ठाकरे सरकारमध्ये नाराज? बाळासाहेब थोरात म्हणाले...

अशोक चव्हाण यांच्या खात्याच्या काही विभागाचे विभाजनाचा प्रस्ताव त्यांना न विचारता मंजुरी देण्याच्या हालचाली सुरू आहे

    मुंबई, 24 जुलै : महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण नाराज असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांच्या नाराजीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. 'अशोक चव्हाण यांची मी भेट घेतली ही बातमीच होऊ शकत नाही. आम्ही दोघे एकाच पक्षाचे आहोत.  अशोक चव्हाण नाराजी ही बातमी कदाचित पेरली असली. खाते विभाजन हा विषय आहे पण त्यावर योग्य चर्चा करून निर्णय घेतला जाईल. आम्ही थोडी काळजी घेतली तर अजून भक्कम सरकार होईल', असं थोरात यांनी म्हटलं आहे. 'महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रम यावर आहे.  चांगल्या पद्धतीने काम सरकारचे सुरू आहे. राज्यात कोरोनाची परिस्थिती असतानाही सरकारने मोठ्या हिंमतीने चांगले काम केले आहे.  आम्ही पुढे व्यवस्थित काम करत राहणार आहे.  विरोधी पक्ष त्यांचे आमदार आश्वासक वाटावे यासाठी विरोधी पक्ष नेते काम करत आहे, असा टोलाही त्यांनी फडणवीसांना लगावला. कोरोनाशी झुंज अपयशी, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड.भास्करराव आव्हाड यांचे निधन अशोक चव्हाण यांच्या  खात्याच्या काही विभागाचे  विभाजनाचा प्रस्ताव त्यांना न विचारता मंजुरी देण्याच्या हालचाली सुरू आहे. त्यामुळे अशोक चव्हाण नाराज असल्याचं समजत आहे. याबद्दल अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच नाराजी व्यक्त केली, असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  त्यांच्या विभागातील काही अधिकारी हे परस्पर प्रस्ताव देत असल्याने अशोक चव्हाण कमालीचे नाराज झाले आहे. यापूर्वीही चव्हाण यांना हवे ते सचिव न दिल्याने  नाराजी होती. त्यात आता अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने भर घातली आहे. अशोक चव्हाण का नाराज? एकनाथ शिंदे मंत्री असलेले सार्वजनिक बांधकाम उपक्रमे विभागास नवीन वेगळा सचिव तसंच इतर अधिकारी वर्ग द्यावा अशी मागणी आणि त्यात वेगळा स्टाफ देण्यास हरकत असल्याचे म्हटले जाते. सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत सार्वाजनिक बांधकाम उपक्रम दोन विभागाचे एक सचिव सध्या आहेत. वेगळा सचिव देण्यास हरकत नाही पण सध्या सार्वाजनिक बांधकाम विभाग अंतर्गत सर्व कर्मचारी वर्ग आहे, तो वेगळा करण्सास हरकत आहे. नेमक्या या मुद्द्यामुळे चव्हाण नाराज असल्याची माहिती आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या