नवी दिल्ली 17 जून: देशातल्या अनेक राज्यांमधली काँग्रेसची सरकारे उलथवून टाकणाऱ्या भाजपला पूर्वेत मात्र धक्का बसला आहे. एन. बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील भाजपचं सरकार संकटात सापडलं आहे. उपमुख्यमंत्री वाय. जॉयकुमार सिंग यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्य सरकार संकटात सापडलं आहे. त्याच बरोबर आणखी 2 भाजप आमदारांनी राजीनामा दिला आहे. आत्तापर्यंत 9 आमदारांनी राजीनामा दिला असून त्या सगळ्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. आत्तापर्यंत भाजपच्या एकूण 3, NPP पक्षाच्या 4 TMC आणि IND या पक्षांच्या प्रत्येकी एका आमदाराने राजीनामा दिलाय. भाजपच्या आमदरांनी राजीनामा देऊन काँग्रेसचे माजी मुख्यंमंत्री इबोबी सिंग यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवश घेतला आहे. त्यामुळे बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालचं सरकार गडगडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकार विरुद्ध असंतोष निर्माण झाला होता. त्याचा फायदा काँग्रेसने घेतला आहे. या राजीनामा सत्रामुळे बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालचं भाजप सरकार अल्पमतात आलं आहे. हेही वाचा - देशात पुन्हा Lockdown लागणार का? पतंप्रधान मोदींनी दिलं हे उत्तर काय निर्णय घेणार ठाकरे सरकार? चकमकीपूर्वी चिनी कंपन्यांसोबत झाला होता करार राज्यात आजही 3307 रुग्णांची धक्कादायक वाढ, एकूण संख्या गेली 1 लाख 16 हजारांवर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.