राज्यात आजही 3307 रुग्णांची धक्कादायक वाढ, एकूण संख्या गेली 1 लाख 16 हजारांवर

राज्यात आजही 3307 रुग्णांची धक्कादायक वाढ, एकूण संख्या गेली 1 लाख 16 हजारांवर

आज 114 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या 5651वर गेली आहे. मुंबईत आज 77 जणांचा मृत्यू झाला.

  • Share this:

मुंबई, 17 जून: राज्यात आजही कोरोना रुग्णांच्या संख्येत धक्कादाय वाढ झाली आहे. आजही 3्307 रुग्णांची नव्याने भर पडली. त्यामुळे एकूण संख्या 1 लाख 16 हजारांवर  गेली आहे. तर आज 114 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या 5651वर गेली आहे. मुंबईत आज 77 जणांचा मृत्यू झाला. तर आज 1315 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

खासगी प्रयोगशाळेत (लॅब) करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी राज्य शासनाने 2200 व 2800 रुपये दर निश्चित केले आहेत. मात्र, थेट लॅबमध्ये तपासणीसाठी जाणाऱ्यांकडून नागरिकांबाबत राज्य सरकारनं दिलासादायक निर्णय घेतला आहे.  थेट लॅबमध्ये येणाऱ्या नागरिकांकडून 2800 रुपये न आकारता त्यांच्याकडून 2500 रुपये घ्यावेत, असा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली. मुंबईमध्ये आठवडाभरात 650 रुग्णवाहिकांची सेवा उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सुमारे दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर भारत सरकारने 1 जूनपासून अनलॉक म्हणजे । कडाऊन सुलभ करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परंतु देशात कोरोनामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी 45 टक्के मृत्यूही या 15 दिवसांत घडले आहेत. भारतात आतापर्यंत कोरोनामुळे 9915 लोकांनी प्राण गमावले आहेत, त्यामध्ये अनलॉक केल्यावर 4507 मृत्यू झाले आहेत.

काय निर्णय घेणार ठाकरे सरकार? चकमकीपूर्वी चिनी कंपन्यांसोबत झाला होता करार

सर्वात चिंताजनक बाब म्हणजे 8 जूननंतर मृत्यूचे प्रमाण संसर्ग दरापेक्षा जास्त वाढले आहे. संसर्गाचे प्रमाण 1.29 टक्के वाढले आहे, तर मृत्यूचे प्रमाण 1.33 टक्क्यांनी वाढले आहे. भारतातील कोरोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूंपैकी जवळजवळ 80 टक्के मृत्यू पाच राज्यांमध्ये नोंदविण्यात आले आहेत.

कहर! आरोग्यमंत्रीही कोरोनाच्या विळख्यात; रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

ही राज्ये महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशात आहेत. त्याचप्रमाणे भारतात असे 65 जिल्हे आहेत ज्यात मृत्यूचे प्रमाण 5 टक्क्यांहून अधिक आहे. यापैकी मध्य प्रदेशातील 19 जिल्हे, गुजरातचे 11, उत्तर प्रदेशातील प्रत्येकी 10 आणि महाराष्ट्रात सर्वाधिक जिल्हा प्रभावित झाले आहेत.

संकलन - अजय कौटिकवार

First published: June 17, 2020, 8:55 PM IST

ताज्या बातम्या