काय निर्णय घेणार ठाकरे सरकार? भारत-चीन चकमकीच्या काही तासांपूर्वी चिनी कंपन्यांसोबत झाला होता करार

काय निर्णय घेणार ठाकरे सरकार? भारत-चीन चकमकीच्या काही तासांपूर्वी चिनी कंपन्यांसोबत झाला होता करार

पुण्यातील तळेगाव आणि इतर भागात मोठी गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे MOU वरुन समोर येत आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 17 जून :  भारत-चीन नियंत्रण रेषेवर झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले. कोणी जर खोळसाळपणा करीत असले तर त्याला उत्तर दिलं जाईल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिला आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकारने तीन चिनी कंपन्यांसह वेगवेगळ्या देशांतील 12 कंपन्यांसमवेत 16,000 कोटी रुपयांचे मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग (सामंजस्य करार/ MOU) वर हस्ताक्षर केले आहेत.

एका अधिकृत निवेदनानुसार या तिन्ही चिनी कंपन्यांनी एकत्रितपणे 5000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक चकमक होण्यापूर्वी सोमवारी 'मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0' अंतर्गत हा सामंजस्य करार झाला. एलएसीवरील (LAC) गलवान व्हॅलीमध्ये भारत आणि चीन यांच्यात झालेल्या हिंसक चकमकींमध्ये 20 सैनिक शहीद झाले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, तीन चीनच्या कंपन्या- हेंगली इंजिनिअरींग, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्यूशन्स जेव्ही विद फोटॉन आणि ग्रेट वॉल मोटर्स या कंपन्या पुणे जिल्ह्यातील तळेगावमध्ये गुंतवणूक करतील.

या निवेदनात म्हटले आहे की, हेंगली इंजिनिअरींग 250 कोटी आणि पीएमआय ऑटो क्षेत्रात 1000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्याचबरोबर ग्रेट वॉल मोटर्स 3,770 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसह एक ऑटोमोबाईल कंपनी स्थापन करणार आहे. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

अमेरिका, दक्षिण कोरिया, सिंगापूर आदी कंपन्यांशी हे करार झाले आहेत. ते म्हणाले की, या कंपन्या ऑटोमोबाईल, लॉजिस्टिक्स, बँकिंग, अभियांत्रिकी आणि मोबाइल उत्पादन अशा विविध क्षेत्रातील आहेत.

या कंपन्या गुंतवणूक करणार

>> एक्झॉन मोबिल (यूएस) तेल आणि वायू - इसाम्बे, रायगड - 760 कोटी रुपये

>> हेनगली (चीन) अभियांत्रिकी- तळेगाव ( क्रमांक -2), पुणे - 250 कोटी

>> सेंडास (सिंगापूर) लॉजिस्टिक- चाकण- तळेगाव, पुणे, भिवंडी, ठाणे 560 कोटी रुपये

>> एपीजी डिसी (सिंगापूर) डेटा सेंटर- टीटीसी, ठाणे- महापे 1100 कोटी >> इस्टेक (दक्षिण कोरिया) इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम डिझाइन - रांजणगाव, पुणे 120 कोटी

>> पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्यूशन जेव्ही विथ फोटॉन (चीन) ऑटो-तळेगाव - 1000 कोटी रुपये

>> रॅकबँक (सिंगापूर) डेटा सेंटर - ठाणे, हिंजवडी, पुणे 1500 कोटी रुपये

>> ग्रेट वॉल मोटर्स (चीन) ऑटो मोबाइल तळेगाव – पुणे - 3770 कोटी रुपये

हे वाचा-देशात चायनीज फूडवर घाला बंदी; भारत-चीन तणावानंतर केंद्रीय मंत्र्यांनी केली मागणी

 

संपादन - मीनल गांगुर्डे

First published: June 17, 2020, 8:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading