नवी दिल्ली, 14 डिसेंबर : दिल्ली विधानसभेच्या (Delhi Assembly) पुरातन वास्तूच्या आवारात दोनच महिन्यापूर्वी ब्रिटिशकालीन बोगदा (British Era Tunnel) सापडल्यामुळे ही वास्तू प्रकाशझोतात आली होती. या ऐतिहासिक बोगद्यापाठोपाठ आता याच वास्तूत ब्रिटिशकालीन फाशीची खोलीही (Execution Room) आढळली आहे. त्यामुळे या वास्तूकडे सर्वांचेच लक्ष वेधले गेले आहे. साधारण 109 वर्षांपूर्वी 1912 मध्ये ही वास्तू बांधण्यात आली आहे.
ही ऐतिहासिक रहस्यमय खोली आणि बोगदा लवकरच पर्यटकांसाठी खुला करण्यात येईल, असं दिल्ली विधानसभेचे सभापती (Delhi Legislative Assembly Speaker) राम निवास गोयल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. या वास्तूच्या दुरुस्तीचं (Repair Work) काम सुरू असताना काही कामगारांना (Workers) या रहस्यमय खोलीचा शोध लागला आहे.
ब्रिटिश राजवटीत त्यांची राजधानी कोलकात्याहून (Kolkata) दिल्लीत (Delhi) स्थलांतरित झाल्यानंतर 1912 मध्ये ही भव्य वास्तू बांधण्यात आली. 1913 ते 1926 या कालावधीत या इमारतीमध्ये मध्यवर्ती संसदेचे (Central Assembly) कामकाज चालत असे. 1926 नंतर ही इमारत संसद म्हणून वापरणं बंद करण्यात आलं. तेव्हा ब्रिटिश प्रशासकांनी या इमारतीचे रूपांतर न्यायालयात (Court) केले आणि इथं क्रांतिकारकांच्या (Freedom Fighters) खटल्यांची सुनावणी करण्याचा निर्णय घेतला. त्या काळात क्रांतिकारकांना लाल किल्ल्यावरून इथं आणण्यासाठी इथल्या बोगद्याचा (Tunnel) वापर केला जात होता, अशी माहिती राम निवास गोयल यांनी दिली. इथल्या मुख्य हॉलमध्ये क्रांतीकारी कैद्यांवरील खटल्याचे कामकाज चालत असे तर दोषींना फाशी देण्यासाठी या खोलीचा वापर केला जात असावा,असा अंदाज गोयल यांनी व्यक्त केला.
सुरक्षा दलांवर हल्ला करण्याचा डाव रचणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्याचा खात्मा
सध्या या वास्तूच्या डागडुजीचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना एका कामगाराने एका भिंतीबाबत माहिती दिली. ही भिंत फार पूर्वीची वाटत नव्हती. त्या भिंतीवर ठोकून बघितले असता ती पोकळ असल्याचं जाणवलं. काहीतरी वेगळं असल्याची जाणीव झाल्यानं ही भिंत तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ही भिंत फोडल्यानंतर आता एक खोली असल्याचं निष्पन्न झालं. ही खोली फाशी देण्याची असल्याचे तिच्या रचनेवरून आणि तिथल्या साधनसामुग्रीवरून स्पष्ट झाल्याचं गोयल यांनी सांगितलं.
Hanging House found inside Delhi Assembly premises
After finding the tunnel (in 2016), hanging house was predicted. We demolished a hollow wall & found it. I can't say what's underneath, will inspect & inform Archeological dept: Ram Niwas Goel, Delhi Legislative Assembly Speaker pic.twitter.com/z2U8K3wI6J — ANI (@ANI) December 13, 2021
या खोलीबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी ऐतिहासिक दृष्टीकोनातून तिचं महत्त्व स्पष्ट होण्याकरता या खोलीच्या भिंतीच्या विटा, लाकूड आणि इतर गोष्टींचा अभ्यास करण्याकरता पुरातत्व विभागाच्या पथकाला (Archeological Department) पाचारण करण्यात येणार असल्याचंही गोयल यांनी नमूद केलं. 100 वर्षांपेक्षा अधिक जुनी इमारत असूनही ही वास्तू पुरातत्व विभागाच्या अखत्यारित नाही.
Coronavirus: कोरोना बाधितांच्या संपर्कात येताच चमकणार 'हा' मास्क
दरम्यान, या इमारतीतून थेट दिल्लीच्या लाल किल्ल्यापर्यंत (Red Fort) गेलेल्या बोगद्याचे नूतनीकरण करून तो लवकरच पर्यटकांसाठी खुला करण्यात येईल. जेव्हा काही महिने दिल्ली विधानसभेचे कामकाज सत्र सुरू नसते त्याकाळात हा बोगदा पर्यटकांसाठी खुला केला जाईल, असं आश्वासन गोयल यांनी दिलं आहे.
त्यामुळे पर्यटकांना आता दिल्ली विधानसभेच्या ऐतिहासिक वास्तूतील ब्रिटिशकालीन बोगद्यासह ही फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी वापरली जाणारी खोलीही पाहता येणार आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांची कथा सांगणाऱ्या या मूक साक्षीदारांचे दर्शन घेणं हा अविस्मरणीय अनुभव ठरेल यात शंका नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi, Delhi News, History