चाश्रीनगर, 14 डिसेंबर: भारतीय सुरक्षा दलांनी (Indian Security forces) जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) पाकिस्तानी दहशतवाद्याचा (Pakistani Terrorist) खात्मा करण्यात यश मिळवलं आहे. अबु झरार (Abu Zarar) नावाचा हा दहशतवादी गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमधील वेगवेगळ्या भागात राहत होता. त्याला पाकिस्तानमधून प्रशिक्षण देऊन पाठवण्यात आलं होतं, अशी माहिती भारतीय सैन्यातील सूत्रांनी दिली आहे. भारतीय सुरक्षा दलांवर हल्ले करण्याची मुख्य जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. मात्र पुंछ-राजौरी भागात भारतीय सुरक्षा दलांनी त्याचा कंठस्नान घालण्यात यश मिळवलं.
पाकिस्तानकडून अशांतता पसरवण्याचा प्रयत्न
गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानकडून जम्मू काश्मीर भागात पुन्हा दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं दिसून आलं आहे. जम्मू काश्मीर राज्यातील वेगवेगळ्या भागात दहशतवादाचा प्रसार करणे आणि मुख्य म्हणजे सुरक्षा दलांवर जबरी हल्ले करणे अशी जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. मात्र भारतीय सैनिक आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत या दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आलं आहे.
तरुणांना भडकावण्याचा प्रयत्न
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अबु झरार या काश्मीर खोऱ्यातील तरुणांना भेटून त्यांची माथी भडकावण्याचा प्रयत्न करत होता. काश्मीरमध्येच तरुणांना भडकावून भारतीय सुरक्षा दलांविरुद्ध लढणारी एक फौज तयार करण्याची जबाबदारी त्याच्यावर पाकिस्तानकडून सोपवण्यात आली होती. वेळोवेळी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणांना भेटून तो नवे दहशतवादी तयार करण्याच्या प्रयत्नात होता. मात्र स्थानिकांच्या मदतीने माहिती गोळा करून पोलिसांनी त्याचा खात्मा केला आहे.
हे वाचा- इंडोनेशियातील त्सुनामीचा भारताला धोका? पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची मोठी अपडेट
असा फसला डाव
अबु झरार हा जम्मू काश्मीर खोऱ्यातील जंगली भागात लपून आपली कामं करत होता. शक्यतो, नागरिकांच्या नजरेत येऊ नये, याची काळजी घेत तो आपल्या कारवाया पार पाडत होता. मात्र अन्न, वस्त्र आणि कम्युनिकेशन यासाठी त्याला नागरी वस्तीत जावंच लागत होतं. त्यावेळी संशयितरित्या फिरणाऱ्या अबु झरारला काही नागरिकांनी पाहिलं होतं आणि संशय आल्यामुळे पोलिसांना याची कल्पना दिली होती. तेव्हापासूनच सुरक्षादले त्याच्या मागावर होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jammu and kashmir, Pakisatan, Terrorist