मराठी बातम्या /बातम्या /देश /Coronavirus: कोरोना बाधितांच्या संपर्कात येताच चमकणार 'हा' मास्क

Coronavirus: कोरोना बाधितांच्या संपर्कात येताच चमकणार 'हा' मास्क

Representative Image

Representative Image

Coronavirus news updates: 32 कोविड रुग्णांना सलग 3 दिवस हे मास्क वापरायला दिल्यानंतर, मास्क अल्ट्रा व्हॉयलेट लाईटमध्ये चमकत होते.

  मुंबई, 14 डिसेंबर : कोरोना व्हायरसचा (Coronavirus) सामना करणं सध्याच्या घडीला सर्वात अवघड काम आहे. कारण त्याचा संसर्ग खूप वेगाने पसरतो. त्यामुळेच कोरोनाच्या नवा व्हेरियंटपासून (Corona New Variant Omicron) स्वतःचा बचाव करण्यासाठी सॅनिटायझर वापरणं आणि तोंडाला मास्क लावणं महत्त्वाचं आहे. कोरोनापासून स्वतःची सुरक्षितता आणखी चांगली करण्यासाठी आता जपानच्या शास्त्रज्ञांनी (Japanese Scientists) असा मास्क बनवला (Scientists Developed Advanced Face Mask) आहे, जो कोरोनाच्या व्हायरस च्या संपर्कात आल्यावर चमकायला (Face Mask Glows When it Detects Covid) लागेल.

  कोरोना रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपायांमध्ये या मास्कचा शोध खूपच महत्त्वाचा ठरू शकतो. मिरर ने दिलेल्या वृत्तानुसार, शास्त्रज्ञांनी या मास्कमध्ये ऑस्ट्रिच सेल्स (Ostrich cells) फिल्टर वापरला आहे. या फिल्टरमुळे मास्क कोरोना व्हायरसला पकडण्यासाठी अधिक प्रभावी ठरतोय. त्यामुळेच कोविड-19 च्या संपर्कात येताच हा मास्क अंधारात चमकू लागेल.

  वाचा : ओमिक्रॉन विषाणूमुळे भारतात तिसरी लाट येऊ शकते का?

  जपानी शास्त्रज्ञांची कमाल

  या मास्कचा शोध जपानच्या क्योटो प्रीफेक्चरल युनिव्हर्सिटीचे (Kyoto Prefectural University) अध्यक्ष यासुहिरो सुकामोटो ( Yasuhiro Tsukamoto) यांनी एका संशोधन गटाच्या सहकार्याने लावला आहे. मास्कवर प्रकाश स्रोत म्हणून एलईडी लाईटदेखील वापरता येऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. ऑस्ट्रिचच्या म्हणजे शहामृगाच्या अंड्यांपासून मिळणारी अँटीबॉडी मास्कमध्ये वापरली गेली आहेत. या पक्ष्यांना कोरोनापासून वाचवण्यासाठी प्रथम इंजेक्शन देण्यात आलं. शहामृग बाह्य संसर्गाला निष्प्रभ करणारे अँटीबॉडीज तयार करण्यात प्रवीण असतात. अशा परिस्थितीत, मास्कवर या अँटीबॉडीची फवारणी करून, कोरोना विषाणूच्या संपर्कात आल्यावर काय होते हे पाहिले गेले. 32 कोविड रुग्णांना सलग 3 दिवस हे मास्क वापरायला दिल्यानंतर, मास्क अल्ट्रा व्हॉयलेट लाईटमध्ये चमकत होते.

  वाचा : तुम्हालाही रात्री होतोय का असा त्रास? हे Omicron symptoms आहे, बिलकुल दुर्लक्ष करू नका

  म्हणून चमकतोय मास्क?

  मास्कवर शहामृगाची अँटीबॉडी वापरल्यानंतर, जेव्हा तो घातला गेला तेव्हा संबंधित व्यक्ती खात असताना, शिंकताना मास्कवर कोरोनाचा व्हायरस आला. यानंतर, जेव्हा मास्क अल्ट्रा व्हॉयलेट लाईटमध्ये ठेवला गेला, तेव्हा तो चमकू लागला. विशेष म्हणजे स्मार्टफोनच्या एलईडी लाईटमध्येही मास्क काम करत होता. आता हे तपासणी किट जपानमधील लोकांना या वर्षाच्या अखेरीस दिले जाण्याची शक्यता आहे. यामुळे कोणत्याही रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे संकेत मिळतील. त्यामुळे बाकीच्या लोकांना संबंधित व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याचे समजू शकेल, तसेच ते संबंधित व्यक्तीपासून सोशल डिस्टन्सिंग ठेवू शकतील.

  First published:

  Tags: Coronavirus, Face Mask