मराठी बातम्या /बातम्या /देश /आघाडी पुन्हा 'ती' रणनीति वापरणार? राज्यात कोरोनाची भयानक रुग्णवाढ, अनिल देशमुखांना जामीन मिळणार? TOP बातम्या

आघाडी पुन्हा 'ती' रणनीति वापरणार? राज्यात कोरोनाची भयानक रुग्णवाढ, अनिल देशमुखांना जामीन मिळणार? TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

मुंबई, 7 जून : राज्यसभा निवडणुकीसाठी (rajya sabha election 2022) आता हालचालींना वेग आला आहे. आमदार फुटू नये म्हणून आघाडीने मुंबईतील हॉटेलमध्ये सर्वांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. माफीचा साक्षीदार बनल्यानंतर सचिन वाझेला पहिल्यांदा कोर्टात हजर केले जाणार आहे. त्याचवेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख जामिनाकरिता अर्ज करणार आहेत. राज्यात कोरोनाची (corona) लाट ओसरल्यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. पण आता राज्याच्या उंबरठ्यावर चौथी लाट येऊन (Fourth wave of coronavirus) ठेपली आहे. देशविदेशातील घडामोडी वाचा अवघ्या काही मिनिटांत.

मुख्यमंत्र्यांसोबत बैठक संपली

शिवसेनेनं (shivsena) आता तिसऱ्या जागेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर आता आमदारांना हॉटेलमध्ये बसेसने नेण्यात आले आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

आघाडीचे मंत्री, आमदार आणि अपक्ष आमदारांची हॉटेल ट्राडंट वर बैठक

राज्यसभा निवडणुकासाठी महाविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आघाडीने सत्ता स्थापनेवेळी केलेल्या शक्तीप्रदर्शनासारखेच प्रदर्शन पुन्हा एकदा करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

आमदारांना हॉटेलवर सोडल्यानंतर एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया

'आम्हाला निवडणुकीचं टेन्शन नाही. आमचे म्हणजे शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी होतील ही एक रणनीती आहे, आम्हाला टेन्शन नाही तुम्हीही टेन्शन घेऊ नका' अशी सूचक प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी दिली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

सचिन वाझेला कोर्टात हजर केले जाणार

माफीचा साक्षीदार बनल्यानंतर सचिन वाझेला पहिल्यांदा कोर्टात हजर केले जाणार आहे. त्याचवेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख जामिनाकरिता अर्ज करणार आहेत.

कोरोनाची चौथी लाट राज्याच्या धडकली?

राज्यात कोरोनाची (corona) लाट ओसरल्यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. पण आता राज्याच्या उंबरठ्यावर चौथी लाट येऊन ( Fourth wave of coronavirus) ठेपली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या (maharashtra corona cases) वाढतच चालली आहे. राज्यातील 5 जिल्ह्यात गेल्या 7 दिवसांत तब्बल 130 टक्के रूग्णाची वाढ झाली आहे. मुंबईसह  पालघर, ठाणे, रायगड, पुणे हे 5 जिल्हे नवे हॉटस्पॉट ठरत आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

ममता बॅनर्जी यांच्या घराजवळ दुहेरी हत्याकांड

कोलकत्त्यात (Calcutta News) ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर मतदारसंघातून दुहेरी हत्याकांडाची (Double Murder) घटना समोर आली आहे. ही घटना ममता बॅनर्जी यांच्या कालिघाट घराजवळील भागात घडली. यात अशोक शहा या शेअर बाजारासंबंधित काम करणाऱ्या व्यक्तीची त्याच्या घरात हत्या करण्यात आली. छातीत गोळी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

Bank Of Maharashtra शाखेत तब्बल 90 लाखांची हेराफेरी

मध्यप्रदेशतील (Madhya Pradesh) बैतूल जिल्हा मुख्यालयाजवळी बँक ऑफ महाराष्ट्राच्या (Bank Of Maharashtra) गंज शाखेत 90 लाखांची अफरातफर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बँक मॅनेजरच्या तक्रारीनंतर गंज पोलिसांनी बँकेच्या 5 कर्मचाऱ्यांवर हेराफेरी केल्याचागुन्हा दाखलकेला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

आणखी एका अपघाताने खळबळ

भारताच्या शेजारील देश नेपाळमध्ये भीषण बस अपघाताचे वृत्त (Bus Accident In Nepal) समोर आले आहे. या अपघातात (Accident) 9 जणांचा मृत्यू झाला आहे. ही बस नेपाळच्या (Nepal) जनकपुर धामच्या दिशेने प्रवास करीत होती. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

First published:

Tags: Top news india, Top news maharashtra