जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / 'आम्हाला आता टेन्शन नाही' आमदारांना हॉटेलवर सोडल्यानंतर एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया

'आम्हाला आता टेन्शन नाही' आमदारांना हॉटेलवर सोडल्यानंतर एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया

'आम्हाला निवडणुकीचं टेन्शन नाही. आमचे म्हणजे शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी होतील ही एक रणनीती आहे

'आम्हाला निवडणुकीचं टेन्शन नाही. आमचे म्हणजे शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी होतील ही एक रणनीती आहे

‘आम्हाला निवडणुकीचं टेन्शन नाही. आमचे म्हणजे शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी होतील ही एक रणनीती आहे’

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 06 जून : राज्यसभा निवडणुकीसाठी (rajya sabha election 2022) आता हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेनं आपले आमदार अपक्षांसह हॉटेलमध्ये सुरक्षित हलवले आहे.  ‘आम्हाला निवडणुकीचं टेन्शन नाही. आमचे म्हणजे शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी होतील ही एक रणनीती आहे, आम्हाला टेन्शन नाही तुम्हीही टेन्शन घेऊ नका’ अशी सूचक प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अपक्ष आमदारांसह शिवसेनेच्या आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर वर्षा बंगल्यावरून सर्व आमदारांना मालाडच्या मारवे मढावर हॉटेल रिट्रीटमध्ये ठेवण्यात आले आहे. ‘आम्हाला निवडणुकीचं टेन्शन नाही. आमचे म्हणजे शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी होतील ही एक रणनीती आहे, आम्हाला टेन्शन नाही तुम्हीही टेन्शन घेऊ नका.  मतदान करण्यासाठी म्हणून हे सर्व आमदार एकत्र ठेवले आहेत. अपक्ष आमदारही आमच्या सोबत आहेत, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. ( लग्नाच्या जेवणातून 180 जणांना विषबाधा, यवतमाळमधील घटना ) तसंच,  महाविकास आघाडीचे चारही आमदार निवडून येतील काही आमदार गैरहजर होते ते बॅग आणायला गेले आहे ते पण येथील आम्हाला टेंशन नाही तुम्हीही टेंशन घेऊ नका, अशी सूचक प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, वर्षा बंगल्यावर नाराज आमदार आशिष जयस्वाल वर्षावर पोहोचले.  मविआ मंत्र्यांवर जयस्वाल यांनी टक्केवारी आणी घोडेबाजार यावर टिप्पणी केली होती. त्यामुळे एकच  खळबळ माजली होती. आमदार आशिष जयस्वाल यांच्याकडे वर्षावर खास लक्ष दिल्याची माहिती आहे.  त्यांची नाराजी दूर करण्यासाठी सेना वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केली.  कोणत्या कामांबाबत ते नाराज असल्याची माहितीही मागितली. तर,  मेळघाटचे अपक्ष आमदार वर्षावर दाखल झाले आहे. वर्षावर सेनेचे जवळपास 35 ते 40 आणि 1 अपक्ष असल्याची माहिती आहे. ( पुरुषांच्या वंध्यत्वावर उपाय सापडला; एका छोट्याशा चिपमुळे झाली स्पर्मची निर्मिती ) आता या  मालाडच्या मारवे मढावर हॉटेल रिट्रीटमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र,मराठवाड्यातील आमदार उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर येणार आहे.  जवळपास 80 टक्के आमदार आज दाखल झाले आहे. 2019 च्या सत्ता स्थापन कालावधीत, याच रिट्रीट हॉटेलमध्ये सेनेच्या आमदारांना ठेवण्यात आलं होतं. येत्या १० जून रोजी राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणक मतदान होणार आहे. त्यासाठी शिवसेनेनं ही रणनिती आखली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात