सीतामडी, 6 जून : भारताच्या शेजारील देश नेपाळमध्ये भीषण बस अपघाताचे वृत्त (Bus Accident In Nepal) समोर आले आहे. या अपघातात (Accident) 9 जणांचा मृत्यू झाला आहे. ही बस नेपाळच्या (Nepal) जनकपुर धामच्या दिशेने प्रवास करीत होती. दरम्यान बस रूपन्देहीच्या रोहिणी पुलावरुन खाली दरीत कोसळली. या बसमध्ये 50 हून अधिक प्रवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस नेपाळच्या जनकपूरहून भैरहवा येथे जात होती. मृतांमध्ये एक महिला आणि 8 पुरुषांचा समावेश आहे. मृतांपैकी 5 जणांची ओळख पटवण्यात आली आहे. मृतांमध्ये दोन भारतीयांचा समावेश आहे. हे दोघे बिहारमधील सीतामडी (Sitamarhi) जिल्ह्याचे राहणारे होते. सासरा-जावईचं त्यांचं नातं होतं. हे दोघेही मजुरी करण्यासाठी तेथे जात होत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस पुलाची रेलिंग तोडून दरीत कोसळली. दुर्घटनाग्रस्त बसचं नाव जिंदगी आहे.
या अपघाताची माहिती मिळताच नेपाळच्या गृहमंत्र्यांनी रुपंदेहीचे मुख्य जिल्हा अधिकारी ऋषी राम तिवारी, लुंबिनी राज्याचे मुख्य पोलिस उपमहानिरीक्षक नल प्रसाद उपाध्याय आणि रुपंदेही पोलिसांचे मुख्य पोलीस अधीक्षक रवींद्र रेग्मी यांना योग्य ती व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.उत्तराखंडमधील बस अपघातात 25 जणांचा मृत्यू
उत्तराखंडमधील (Uttarkashi in Uttarakhand) उत्तरकाशी येथे झालेल्या बस अपघातानंतर मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) शोककळा पसरली आहे. या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. बहुतांश प्रवासी हे पवई विधानसभा गाव-मोहंद्रा आणि चिकलहाई येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (State Chief Minister Shivraj Singh Chouhan) यांनी या दुर्घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आणि रात्री उत्तराखंडला रवाना झाले. मंत्री ब्रजेंद्र प्रताप सिंह (Minister Brajendra Pratap Singh) आणि चार वरिष्ठ अधिकारीही त्यांच्यासोबत उत्तराखंडला गेले आहेत. रात्री डेहराडूनमध्ये संपूर्ण बचाव आणि जखमींच्या व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासोबतच मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने सकाळी उत्तरकाशी जिल्ह्याला रवाना होतील.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.